शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी लढा - नीलिमा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:59 IST

गेली पाच वर्षे सभासदांना दिलेल्या वचनांची पूर्ती करताना कर्मवीरांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिस्त, गुणवत्ता व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला. केवळ संस्था आणि सभासद हितच डोळ्यासमोर ठेवले. सुसंस्कृत समाज आणि विद्यार्थी घडविण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक लढवित असल्याचे प्रतिपादन मावळत्या सरचिटणीस व प्रगती पॅनलच्या नेत्या श्रीमती नीलिमा पवार यांनी केले.

नाशिक : गेली पाच वर्षे सभासदांना दिलेल्या वचनांची पूर्ती करताना कर्मवीरांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिस्त, गुणवत्ता व पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला. केवळ संस्था आणि सभासद हितच डोळ्यासमोर ठेवले. सुसंस्कृत समाज आणि विद्यार्थी घडविण्यासाठी पुन्हा एकदा निवडणूक लढवित असल्याचे प्रतिपादन मावळत्या सरचिटणीस व प्रगती पॅनलच्या नेत्या श्रीमती नीलिमा पवार यांनी केले.  मागील निवडणुकीत बहुमताने निवडून दिल्यामुळेच मला व माझ्या सहकाºयांना पूर्णत: लोकशाही पद्धतीने व कार्यक्षमपणे संस्थेचा कारभार करण्याची संधी मिळाली. त्यामुळे एकाधिकारशाही किंवा हिटलरशाहीचा आरोप मुळातच दिशाभूल करणारा आहे. शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीच्या आधारे संस्थेची लौकिकार्थाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता आली. यापुढील काळातही संस्थेच्या माध्यमातून समाजाचा विकास साध्य करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू. गेल्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकल्यावर संस्थेचा झालेला विकास आपल्यासमोर येईल. संस्थेच्या नवीन १२५ शाखा व ३०१ वर्ग नव्याने सुरू केले. सीबीएसई पॅटर्न किंवा नीटच्या धर्तीवर डिजिटल बॅच सुरू केली. विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू केले. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व रिसर्च सेंटर येथील खाटांची क्षमता ७०० वरून १०५० व नेली. अनेक नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या. विना अनुदानित सेवकांच्या वेतनात ३२ कोटी ८४ लाखांनी वाढ केली. ३८१ सेवकांच्या विना अनुदानितकडून अनुदानित श्रेणीत मान्यता मिळविल्या. ४४ शाखांना नवीन इमारती बांधल्या, तर ४६ इमारतींचे विस्तारीकरण केले.संस्थेला महाराष्टÑ शासनाचा आदिवासी सेवा संस्था पुरस्कार आपल्याच काळात लाभला. भविष्यात अनेक नवीन संकल्पना व योजना आखल्या आहेत. सर्व शाखांमध्ये प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी माहिती व तंत्रज्ञान या विभागाचा अंतर्भाव करण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील सीईटीला सामोरे जाण्यासाठी संस्थापातळीवर नवी शैक्षणिक पद्धती सुरू करण्यात येईल. भविष्यात सैनिकी शाळा सुरू करण्याचा मानस आहे. मविप्र रुग्णालयात कॅन्सर सेंटर कोबाल्ट युनिट सुरू करण्यात येईल. इतकेच नव्हे तर मविप्रचा शैक्षणिक दूरचित्रवाहिनी सुरू करण्याचा मानस आहे. मतदारांनी विश्वास, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीला प्रमाण मानून मतदान करावे, असे आवाहन नीलिमा पवार यांनी केले आहे.