शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

किडन्या निकामी असूनही कोरोनाशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:04 IST

दोन्हीही किडन्या निकामी झालेल्या युवकाने कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून त्याला निरोप देण्यात आला. गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्याचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. जिद्द आणि आरोग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे या युवकास नव्या दमाने जगण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरुग्णालयातून डिस्चार्ज : बेलगाव कुºहेकरांनी केले स्वागत

नांदूरवैद्य : दोन्हीही किडन्या निकामी झालेल्या युवकाने कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयातून त्याला निरोप देण्यात आला. गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्याचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. जिद्द आणि आरोग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे या युवकास नव्यादमाने जगण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.दर आठवड्याला डायलिसिस सुरू असलेल्या बेलगाव कुºहे येथील कोरोनाबाधित ५५ वर्षीय रेल्वे कर्मचारी उपचाराअंती दोनच आठवड्यात कोरोनामुक्त झाला. त्यांच्यावर भायखळा येथील मध्य रेल्वेच्या विभागीय रुग्णालयात डायलिसिस उपचार सुरू होते. दरम्यान त्यास कोरोनाची लागण झाली. रुग्णालयाची परवानगी न घेता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता परिवाराने त्यांना थेट मूळ गावी आणले होते. गावात कोरोनाबाधित रुग्ण आल्याचे समजताच खळबळ माजली. बेलगाव कुºहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक हजर झाले. त्यांनी तत्काळ रुग्णास रुग्णवाहिकेद्वारे नाशिकला कोविड रुग्णालयात दाखल केले.दरम्यान रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांना क्वॉरण्टाइन करण्यात आले. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तर दोन आठवड्यांपासून कोरोनावर उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णाचा अहवालही निगेटिव्ह आल्याने त्यास रुग्णालयातूनघरी सोडण्यात आले. रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप परत आल्याने नातेवाइकांसह ग्रामस्थांनी औक्षण व पुष्पवृष्टी करत त्याचे स्वागत केले.

कोविड १९ विषाणू प्राणघातक असला तरीही बाधित व्यक्तीने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले. स्वच्छता राखून योग्य उपचार घेतले, घाबरून न जाता धैर्याने सामना केला. दोन्हीही किडन्या निकामी झालेला रु ग्णही कोरोनावर मात करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.- डॉ. जी. पी. बांबळे, वैद्यकीय अधिकारी, बेलगाव कुºहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य