शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठा अन् अस्तित्वाची लढत

By admin | Updated: February 15, 2017 01:09 IST

दुरंगी सामना : गट महिला राखीव झाल्याने चुरस वाढली

सागर रायजादे : नगरसूलजिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाल्याने नगरसूल या गटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लाभलेल्या नगरसूल जिल्हा परिषद गटात यंदा मात्र आरक्षणाने मातब्बरांना वाकुल्या दाखविल्याने काहीशी नाराजी झाली असली तरी, महत्त्वाकांक्षेमुळे सेनेच्या संभाजीराजे पवारांची प्रतिष्ठा आणि राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाईमुळे या गटाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सलग दोन पंचवार्षिक आमदारकीचा अनुभव आणि गत विधानसभेच्या निवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचे संभाजीराजे पवार यांनी कडवी झुंज दिल्याचा इतिहास आहे. यामुळे पवारांशी सामना कोणी करावा, यासाठी राष्ट्रवादी चिंतन करीत असताना त्यांना इतर मागास वर्गीयात उमेदवार सापडेना, अशी स्थिती होती. स्वर्गीय आमदार जनार्दन पाटील यांच्या स्नुषा कालिंदी पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ केली होती. परंतु त्यांनी घड्याळ हातात न घेता अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि तो अपेक्षेप्रमाणे माघारीही घेतला.  अखेर सुनील पैठणकर या भुजबळ यांच्या कट्टर समर्थकास आदेश झाला. आणि त्यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला पैठणकर यांना उमेदवारी करावी लागली. यामुळे बिनविरोध होणारी निवडणूक नगरसूल गटात दुरंगी झाली. नगरसूल गट-गण आणि सावरगाव गणात शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवारीचे सारखेच सामाजिक समीकरण बसवण्याचा प्रयत्न केला असला तरी सेनेने उजवी चाल खेळत वातावरण निर्मिती केली आहे, तर कार्यकत्यांचे मोहळ असल्याने पवारांनी प्रचारात चांगलाच रंग भरला. नगरसूल गटात भाजपाने उमेदवारच दिला नाही. शिवाय सावरगाव गणात राष्ट्रवादीला उमेदवार देता आला नाही.  नगरसूल गटात शिवसेनेतर्फे सविता बाळासाहेब पवार रिंगणात आहेत. मारोतराव पवार यांचा दहा वर्षांचा आमदारकीचा काळ, सततचा दांडगा जनसंपर्क, मागेल त्याला मदतीचा हात ही सविता पवार यांची बलस्थाने आहेत. राष्ट्रवादीकडून उज्ज्वला सुनील पैठणकर रिंगणात आहेत. सुनील पैठणक यांची आमदार छगन भुजबळ यांचे समर्थक व कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. उज्ज्वला पैठणकर या सध्या नगरसूल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत, तर सुनील पैठणकर यांनी यंदा सोसायटीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन केली असून, ही उज्ज्वला पैठणकर यांची बलस्थाने आहेत. गटातील समीकरणात बदलजिल्ह्यााच्या राजकारणात नगरसूल गट सातत्याने प्रभावी ठरला आहे. सावरगाव गणाच्या समावेशामुळे नगरसूल गटाची गणितं आता बदलली आहेत. आता या गटात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. गटात आरक्षणामुळे इच्छुकांना आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरावे लागले. या गटात नेहमी पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा या पाणीप्रश्नावर निवडणुका लढविल्या गेल्या. मोठ्या प्रमाणावर आमदार भुजबळ यांच्या कार्यकाळात या कालव्याचे काम झाले असले तरी काम अद्याप अपूर्ण आहे. भाजप-सेनेने सत्ता काळात या कालव्याचा प्रश्न अद्याप जिव्हाळ्याने हाताळला नाही. या कालव्याचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे.