शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

चोरीच्या पन्नास सायकली जप्त

By admin | Updated: May 4, 2016 00:27 IST

पोलीस कारवाई : विधीसंघर्षित बालक ताब्यात

पंचवटी : परिसरातील क्लास तसेच इमारतीच्या आवारात उभ्या केलेल्या सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी पोलिसांनी पेठरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणाऱ्या चौघा विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या चौघा बालकांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागांतून या सायकल चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पेठरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरातील काही बालक सायकल चोरी करत असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटेच वज्रेश्वरी झोपडपट्टीत गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय गवांदे, सचिन म्हसदे, सतीश वसावे, दशरथ निंबाळकर, कट्यारे आदिंसह कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एका बालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरी करणाऱ्या चौघा विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून अंदाजे एक लाख रुपये किंमत असलेल्या पन्नास सायकली जप्त केल्या आहेत. (वार्ताहर)