नाशिक : ‘मैत्रेय’ फसवणुकीतील ३०७ ठेवीदारांची पाचवी यादी बुधवारी (दि. १७) बँकेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली. या ठेवीदारांची फसवणुकीची रक्कम ४० लाख रुपये असून या यादीसह आतापर्यंत एक हजार १६५ गुंतवणूकदारांना एक कोटी ४१ लाख ६६ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़ न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या विशेषाधिकार समितीच्या माध्यमातून मैत्रेयच्या इस्क्रो खात्यातून गुंतवणूकदारांचे प्राधान्यक्रमानुसार पैसे परत केले जात आहेत़ दुसऱ्या टप्प्यातील ३०७ ठेवीदारांना एकूण ४० लाख १७ हजार ७१० रुपये अदा करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
मैत्रेय गुंतवणूकदारांची पाचवी यादी बुधवारी
By admin | Updated: August 17, 2016 00:53 IST