शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षांतील कामे वर्षभरात

By admin | Updated: October 19, 2015 22:11 IST

भाजपाचा दावा : सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त जाणार घराघरात

नाशिक : गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यांच्या कार्यकाळात जे त्यांना जमले नाही, ते आम्ही वर्षभराच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात करून दाखविल्याचा दावा भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी केला.नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनापासून इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जलयुक्त शिवार अभियान, सौर ऊर्जा पंपवाटप अभियान यांसह काही महत्त्वपूर्ण घडामोडी या वर्षभरात झाल्याचा दावा त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. वर्षपूर्तीनिमित्त राज्यभरात २३ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील ९० हजार बूथवर भाजपाच्या वतीने महालोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींचा सिंचनाचा घोटाळा झाला, तर आमच्या वर्षभराच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यभर लोकसहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात आला असून, त्यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यात निव्वळ लोकसहभागाची रक्कम ३०० कोटींच्या घरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथे स्मारक, तसेच लंडन येथील घर ३५ कोटींना विकत घेतले आहे. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचेही स्मारक होणार आहे. वर्षभराच्या कार्यकाळात भाजपा सरकारने केवळ उद्योग, शेतकरी, सिंचनच नव्हे तर समाजकार्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रास्ताविकात सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, गिरीश पालवे, सुरेश पाटील, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, संभाजी मोरुसकर, सतीश कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)