शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवस वाढवले : बीएलओेंची होणार धावपळ मतदार याद्यांच्या कामास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:56 IST

देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामुळे या कामास गती द्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

ठळक मुद्देबीएलओंना काहीसा दिलासा घरोघरी जाऊन सर्वेक्षण

नाशिक : देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास आणखी पंधरा दिवस मुदतवाढ देण्याबरोबरच त्यामुळे या कामास गती द्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे बीएलओंना काहीसा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने देशपातळीवर प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी मतदार पुनरीक्षण मोहीम १ नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकाºयांची (बीएलओ) नेमणूक करून मतदारांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने नवीन मतदाराची नोंदणी, दुबार व मयत मतदारांच्या नावात कपात, मतदान केंद्रातील बदल, मतदारांची छायाचित्रे गोळा करणे अशी कामे प्रत्येक घरोघरी जाऊन करणे अपेक्षित धरले आहे. शिवाय मतदारांची संपूर्ण माहिती आॅनलाइन भरून, त्याच्या निवासाचे अक्षांश-रेखांशदेखील नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.या कामासाठी सर्वच शासकीय कर्मचाºयांची नेमणूक करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, जिल्हाधिकाºयांनी शिक्षकांवरच ही कामे सोपविली आहेत. मुळात नोव्हेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना त्यात शाळेचे कामकाज सांभाळून मतदार याद्यांचे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शविला होता. त्यातच काही शाळेच्या सर्वच्या सर्व शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामात जुंपल्यामुळे शाळा ओस पडण्याच्या भीतीपोटी संस्थाचालकांनीच शिक्षकांना मतदार यादीच्या कामापासून दूर ठेवले. परिणामी देशपातळीवरच मतदार याद्यांचे पुनरीक्षण धीम्या गतीने होत असल्याची बाब केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच घेतलेल्या राज्यांच्या आढाव्यावरून स्पष्ट झाली.