शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजरोडवरील बेकरीला भीषण आग

By admin | Updated: July 26, 2016 00:44 IST

मध्यरात्रीची घटना : सिलिंडरच्या स्फोटाने हादरला परिसर

 नाशिक : सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवरील बंगळुरू अय्यंगार बेकरीला अचानक आग लागली. आगीने अल्पावधीतच रुद्रावतार धारण केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिलिंडरचा स्फोट झाल्याने कॉलेजरोड हादरला.याबाबत अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कॉलेज रोडवरील आसावरी व्यापारी संकुलातील राजेंद्र शेलार यांच्या अय्यंगार बेकरीने मध्यरात्री अचानक पेट घेतला. कॉलेज रोडवरून याबाबत ‘कॉल’ येताच मुख्यालयातून पहिला बंब अवघ्या पाच मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचला. आगीचा रुद्रावतार व बेकरीपासून जवळच असलेले पेंटचे दुकान यामुळे लिडिंग फायरमन इकबाल शेख यांनी तत्काळ दुसरा बंबही मुख्यालयातून बोलाविला. कॉलेज रोडवरून समोरील बाजूने आग विझविण्याचे कार्य जवान करत असताना मागील बाजूने बेकरीमधील एका सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. रहिवासी झोपेतून जागे झाले आणि घरांबाहेर पडले. बेकरीलाच लागून असलेल्या वृषाली बुक स्टॉल अ‍ॅन्ड स्टेशनरी दुकानाच्या सामाईक भिंतीला या स्फोटाने भगदाड पडले. आगीच्या ज्वाला पुस्तक विक्रीच्या दुकानामध्ये पोहचल्याने पुस्तके बेचिराख झाली. तसेच दोन झेरॉक्स यंत्रांचेही नुकसान झाले. वह्या-पुस्तके, स्टेशनरी, फर्निचर जळाल्याने सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज राजेंद्र भामरे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)