शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात रोडरोमिओंविरोधात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 12:51 IST

येवला : शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात व कट्ट्यावर घिरट्या घालणार्या रोडरोमीओंविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे.

येवला : शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमीओंविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत येवला शहर पोलिसांनी तिघांवर शांतात भाग करून सार्वजनिक ठिकाणी दंडात्मक करण्याचा धडाका लावला आहे. येथील गंगादरवाजा भागात दोन मोठी विद्यालये आहेत. सुमारे सात हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.विद्यार्थ्यांच्या मधली सुटीसह शाळा सुटण्याच्या वेळेत अनेक रोडरोमीओ आपला काम धंदा सोडून शालेय परिसरात घिरट्या घालत असल्याचे चित्र दिसत असते.शालेय प्रशासन अनेकदा या गुंड प्रवृत्तीच्या व दहशत निर्माण करणार्या रोडरोमीओ विरोधात आवाज उठवत असले तरी कायद्याच्या मर्यादा पडतात. परंतु आता येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस उपनिरीक्षक वाय.ए.चव्हाण यांनी अशा बेताल युवकांच्या विरोधात मोहीम उघडली असून धडक कारवाईला सुरु वात केली आहे. यामुळे काही प्रमाणात अशा रोडरोमीओना काही प्रमाणात आळा बसला असला तरी मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. महागड्या गाड्या घेवून शाळा महाविद्यालय परिसरात घिरट्या घालत विनाकारण त्रास देणाऱ्या या प्रवृत्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी होत असल्याने पोलिसांनी तिघांवर प्रतिबंधात्मक दंडात्मक कायदेशीर कारवाई केली आहे. विविध शाळांच्या मधल्या सुटीची वेळ सकाळी ९ ते १० च्या दरम्यान व शाळा सुटण्याची वेळ ११.४० ते १२.३० अशा आहेत. या वेळेत पोलिसांनी गस्त वाढवावी अशी अपेक्षा येथील शाळा प्रशासन प्रमुखांनी व्यक्त केली आहे.===================================पोलीस शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आपले कर्तव्य पाडत आहे.पोलीस गाड्यांची गस्त देखील सुरु ठेवण्यात येईल. मुली,महिला,सुरक्षिततेसाठी पोलीस प्रयत्न करीत आहेच.काही प्रकार निदर्शनास आल्यास शाळा प्रमुखांसह नागरिकांनी देखील थेट पोलिसांशी संपर्क साधावा. विनाविलंब कारवाई केली जाईल. गेल्या दोन दिवसात तीन रोडरोमीओ विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.-संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक,येवला