शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

चिमुकल्या खेळाडूंचा सत्कार

By admin | Updated: January 7, 2016 23:17 IST

कौतुक : अतिदुर्गम भागातील मुलींची राष्ट्रीय पातळीवर झेप

पेठ : नाचलोंढीहे पेठ व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारे दोन्ही तालुक्यांसाठी सर्वाधिक अतिदुर्गम गाव़ या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या निर्मला व वर्षा चौधरी या दोन भगिनींनी रांची झारखंड येथील राष्ट्रीय खेळकूद क्रीडा स्पर्धेत देशपातळीवर पहिला क्रमांक मिळवला आणि सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत हिच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या या मुलींचा संपूर्ण गावकऱ्यांनी केलेला हृद सत्कार इतर कोणत्याही बड्या सत्कार समारंभाला लाजवणारा ठरला़नाचलोंढीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक भगवान हिरकूड यांनी या मुलींच्या अंगी असलेल्या गुणांची पारख करण्याबरोबरच या परिसरातील डोंगरदऱ्यात पहाटे स्वत: मुलांबरोबर धावण्याचा सराव केला़ यामुळे अतिशय खडतर परिस्थितीत झालेला सराव या भगिनींना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिंकताना कामी आला़नाचलोंढी येथील प्राथमिक शाळेत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला़ यावेळी शिक्षण समिती सदस्य भास्कर गावित, सभापती जयश्री वाघमारे, उपसभापती महेश टोपले, माजी सभापती अंबादास चौरे, पंचायत समिती सदस्य मंदा चौधरी, गटविकास अधिकारी बी़ बी़ बहिरम, गटशिक्षणाधिकारी के. बी़ माळवाळ आदि उपस्थित होते़ यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने एक हजार रुपये, तंटामुक्त गाव समितीच्या वतीने एक हजार रुपये, गटशिक्षणाधिकारी के. बी. माळवाळ यांच्याकडून एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक या मुलींना प्रदान करण्यात आले़ आदिवासी भागातील मुलांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास पेठ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतील असे जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांनी सांगितले़ उपसभापती महेश टोपले, गटविकास अधिकारी बहिरम, गटशिक्षणाधिकारी माळवाळ आदिंनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी प्रशिक्षक भगवान हिरकूड, माया भोये यांच्यासह निर्मला व वर्षा यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला़याप्रसंगी सरपंच कुसुम चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव चौधरी, पोलीसपाटील केशव बोरसे, उपसरपंच तुकाराम चौधरी, विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर, तुळशीराम वाघमारे, रामदास महाले, प्रकाश भोये, दिलीप चौधरी, कैलास चौधरी, प्रकाश तुंगार, मुख्याध्यापक आऱपी़ सुपारे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामदास शिंदे, केंद्रप्रमुख संजीव शेवाळे, वानखेडे, ग्रामसेवक अविनाश पाटील, शिक्षक गायकवाड, उमाकांत घुटे, चौधरी, भोये यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ सीताराम चौधरी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले़