शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
4
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
5
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
6
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
7
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
8
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
9
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
10
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
11
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
12
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
13
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
14
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
15
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
16
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
17
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
18
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
19
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
20
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?

लोकोत्सव नव्हे लोकयातना उत्सव!

By admin | Updated: September 29, 2015 00:22 IST

लोकोत्सव नव्हे लोकयातना उत्सव!

नाशिक : कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो करोडो लोक विशिष्ट दिवशी एकत्र जमतात, त्या बारा वर्षांनी भरलेल्या कुंभमेळ्यातील पर्वण्या अखेर पार पडल्या आणि त्यात कोणतीही दुर्घटना न घडल्याने साऱ्याच यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी यशस्वीतेचे ढोल बजावण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यात दुर्घटना घडली नाही ही जमेची बाजू असली तरी कुंभमेळा खरोखरीच यशस्वी झाला काय, गावातील लोक यात सहभागी झाल्याने हा खरोखरीच लोकोत्सव झाला की सरकारी यंत्रणेचे मुखंड आणि मोजके लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते, राजकारण्यांशी संबंधित व्यावसायिक, ठेकेदार यांच्यापुरताच हा उत्सव मर्यादित राहिला, याची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे. नव्हे ही चिकित्सा लोकभावनेने कधीच केली आहे. त्यामुळे हा लोकोत्सव झालाच नाही, केवळ मोजक्या घटकांपर्यंतच तो मर्यादित राहिला. कुंभमेळा हा बारा वर्षांनी होणारा जागतिक दर्जाचा सोहळा असला आणि तो नाशिकमध्ये भरत असल्याने आपण सारेच भाग्यवान आहोत असे समजणाऱ्या नागरिकांना भविष्यात तर कुंभमेळ्यातील पर्वण्यांच्या नावांनीच अंगावर काटे उभे न राहतील तर नवलच! कुंभमेळ्याच्या नियोजनाला तशी तीन चार वर्षांपूर्वीच सुरुवात झाली असली तरी सर्व आराखड्यात पर्वणीच्या दिवशी एक कोटी भाविक येणार आणि त्यामुळे संपूर्ण शहरात अव्यवस्था होऊ शकेल अशा अंदाजानेच सारे नियोजन करण्यात आले. त्यातही कुणाचे दुमत नव्हते. परंतु साधूंसाठी साधुग्राम, बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळ, अंतर्गत वाहनतळ, बससेवा, रेल्वेसेवा असे नियोजन करताना नाशिककर कुठे राहतील, त्यांच्या सोयी-सुविधांचे काय याचा कोणत्याही आखाड्यात उल्लेख नव्हताच. आजी माजी पोलीस आयुक्तांनी तयार केलेल्या आणि त्यांना अन्य प्रशासकीय यंत्रणांनी मम म्हटलेल्या आराखड्यांमध्ये स्थानिक नागरिकांचा कोठेही विचार नव्हता. स्थानिक नागरिक काय कधीही काहीही सांगितले तर त्यांना ऐकावेच लागेल, अशा अविभार्वात सर्वसामान्यांना गृहीत धरून जे नियोजन झाले त्यातून एका पर्वणीला तीन दिवस म्हणजेच तीन पर्वण्यांना नऊ दिवस असे सर्व शहरच बंद ठेवण्याचा जालीम उपाय सुरक्षिततेच्या नावाखाली तयार करण्यात आला. शाळेत मुलांनी जायचे नाही, कामगारांनी कारखान्यात जायचे नाही, रुग्णांनी रुग्णालयात अगोदरच (आजार होण्याआधी) दाखल व्हा, दूध-पाणी जे काही पाहिजे, ते अगोदरच आणून ठेवा, नंतर कोणाला कोणत्याही सबबीवर बाहेर पडता येणार नाही एक प्रकारे घरातच सारे स्थानबद्ध अशा प्रकाराच्या धमक्यासदृश नियोजनाने सारेच निर्बंधाच्या चक्कीत पिसले गेले. आम्ही कोणतेही निर्बंध घातले नव्हते, इतकेच नव्हे तर दुकाने बंद करायला सांगितले नव्हते असे नंतर सांगणाऱ्या पोलीस यंत्रणेने पहिल्या पर्वणीला मेनरोड परीसरात दुकानदारांना शिवीगाळ करीत आणि दंडुके मारत दुकाने बंद करायला लावली, हे मात्र कबूल केले नाही. निर्बंधाचा इतका अतिरेक होता की, नाशिक आणि पंचवटी अमरधाममधून अंत्ययात्रा परत पाठविण्यात आल्या. दक्षिण गंगा गोदावरीत क्रिया-कर्म विधीसाठी देशभरातून नागरिक येतात, परंतु येथे नाशिककरांना आपल्याच गावात रामकुंडावर जाण्यास मनाई करण्यात आली. पर्वणीच्या दिवशी बाहेरगावातील नागरिक सोडाच परंतु स्थानिक भाविकांच्या नशिबी पाच सात किलोमीटरची पायपीट आली. बाहेरगावच्या नवख्या पोलिसांमुळे तर स्थानिक नागरिकांना इतका त्रास झाला की समोर रस्ता ओलांडून जाणे सहज सुलभ असताना प्रत्यक्षात पोलिसांकडून सरळ जाऊ देण्याऐवजी दोन किलोमीटरचा फेरा घालून या असे सांगितले जात असलाने नवख्या पोलिसांना समजवताना स्थानिक नागरिकांची नाकीनव येत होती.बॅरिकेड तर गावभर इतके मनपूत लावण्यात आले होते की, संपूर्ण शहर बंदिस्त करण्याच्या या कृतीमुळे नंतर सोशल मीडियावर पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना देशाच्या सीमा सील करण्यासाठी केंद्रात पाठवायला हवं अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या. मग, कुठे यंत्रणेला शहाणपण आले परंतु अगोदरच्या नियोजनात फार बदल झाला नाही. काही भागातील बॅरिकेड हटविण्यात आल्या आणि शहर बस वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच वाहतूक निर्बंध उशिरा लागू करण्यात आले. इतकीच काय ती जमेची बाजू. बाकी फार फरक पडला तर नाहीच, शिवाय पहिल्या पर्वणीमुळे जी नाचक्की झाली ती झालीच! एक कोटी भाविक आले नाहीत परंतु ते येणार म्हणून जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास व्हायचा त्याच्या दसपट त्रास अतिरेकी नियोजनामुळे झाला.नाशकात मानवता का मेला भरला असला तरी प्रत्यक्षात माणुसकीने कोणत्याही यंत्रणेने वागणूक दिली नाही. त्यामुळे कुंभमेळ्यात साधू-महंत आले. त्यांनी शाहीस्नान केले. या साऱ्या आठवणींपेक्षा पोलीस आणि शासकीय यंत्रणांचा जाच, त्यामुळे झालेले हाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुंभमेळा आपल्यासाठी नव्हताच, ही भावनाच अधिक स्मरणात राहणारी ठरेल. बाकी नाशिककरांनी पर्वणीच्या दिवशी रामकुंडात कितपत स्नान केले, हे ज्याचे त्यालाच माहीत. (प्रतिनिधी)