शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: June 26, 2016 00:34 IST

मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

 नाशिकरोड : मन, मेंदू व मनगटाचा विकास शिक्षणातून होत असतो. मात्र आजचे शिक्षण केवळ करियर प्राप्तीचे एक साधन बनले असून, देशास महासत्ता बनविण्यासाठी आवश्यक चारित्र्यवान पिढी बनविण्यासाठी कमी पडत आहे, असे मत नवनियुक्त नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. चेहेडी बुद्रुक येथील मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अनंत आमुची ध्येयासक्ती.. तरुणांचा आशावाद या विषयावर बोलताना विकास नवाळे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, खुदीराम बोस यांसारख्या थोरांनी आपल्या आयुष्याच्या उमेदीच्या काळातच कर्तृत्व घडविल्याने त्यांची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांत झाली. आजच्या युवा पिढीलाही याच आदर्शाचे पालन करणे गरजेचे आहे. करियर घडविण्याच्या ओढाताणीत माणूस बनण्यासाठी आवश्यक व्यक्तिमत्त्वाचा विकास आपल्या पाल्यात होण्यासाठी पालकांनी कटाक्षाने लक्ष घातले पाहिजे, असे प्रतिपादन नवाळे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट व नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेले अरुण भिसे, शरद गायधनी, अश्विनी टिळे, इरफान शेख, नेहा चव्हाण व विविध शाळांतील दहावीतील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब बोराडे व सूत्रसंचालन गजानन चव्हाण यांनी केले. यावेळी बापू ताजनपुरे, रेवण कांगणे, सचिन सोर, धनंजय सरक, दत्तात्रय अलगट, डॉ. शरद गायकवाड, सचिन चिखले, अनिल गायखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)