शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फुले विद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:48 IST

सिन्नर : क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाचा वसा दिला. मुलींनी तो वसा घेत शिक्षणातून प्रगती साधावी, आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. त्यामुळे घरात तसेच समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देशीतल सांगळे : समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

सिन्नर : क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाचा वसा दिला. मुलींनी तो वसा घेत शिक्षणातून प्रगती साधावी, आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. त्यामुळे घरात तसेच समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केली.येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभ व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना सांगळे बोलत होत्या. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंंद्रकांत वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, चित्रा लोंढे, मीनाक्षी झगडे, प्रीती वायचळे, वैशाली भगत, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव लहामगे, विष्णुपंत बलक, संचालक सुनील गवळी, राजेंद्र आंबेकर, कैलास झगडे, दत्ता गोळेसर, योगेश पाचोरे, प्राचार्य वंदना साळुंके आदी उपस्थित होते.मुलींची संख्या जास्त असल्याने समाधान वाटते. मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे, असे आवाहन करतानाच शैक्षणिक गरज लक्षात घेऊन संगणक कक्षाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील, अशी ग्वाही सांगळे यांनी दिली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक संकुलातील वर्षभरातील विविध स्पर्धा, परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य वंदना साळुंके यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, माता, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.महात्मा फुले शैक्षणिक संकुलातून आजवर अनेक विद्यार्थी घडविले असून, विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करून देशसेवा करीत आहेत, विद्यार्थिवर्ग तळागाळातील आहे आम्ही त्यांना घडवतो, असे प्रतिपादन वरंदळ यांनी केले. विद्यालयासाठी संगणक कक्षाची गरज असल्याचे त्यांनी सांगत सांगळे यांना संगणक कक्ष मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले. यावेळी कैलास झगडे, राजेंद्र आंबेकर, सोनाली पवार आदींनी मार्गदर्शन केले.