शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पोत्सवाच्या प्रदर्शनातून गुलशनाबादची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:15 IST

फुलांचे विविध प्रकार, तबकात फुललेले बगिचे, शिवाय पुष्परांगोळ्या आणि जोडीला फुलदाणीतील सजावट तसेच अनेक वर्षांचे परंतु कुंडीत ठेंगणीच राहिलेली बोन्साय! निसर्गातील फळा-फुलांच्या उत्सवामुळे पुष्पोत्सवात रंग भरला. शिवरात्रीच्या सुटीचे औचित्य साधून नाशिककरांनी गुलशनाबादची अनुभूती शुक्रवारी (दि.२१) घेतली.

ठळक मुद्देप्रचंड गर्दी : सुटीमुळे वाढला प्रतिसाद

नाशिक : फुलांचे विविध प्रकार, तबकात फुललेले बगिचे, शिवाय पुष्परांगोळ्या आणि जोडीला फुलदाणीतील सजावट तसेच अनेक वर्षांचे परंतु कुंडीत ठेंगणीच राहिलेली बोन्साय! निसर्गातील फळा-फुलांच्या उत्सवामुळे पुष्पोत्सवात रंग भरला. शिवरात्रीच्या सुटीचे औचित्य साधून नाशिककरांनी गुलशनाबादची अनुभूती शुक्रवारी (दि.२१) घेतली.शहरी भागात पर्यावरणाचे महत्त्व वाढावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत पुष्पोत्सव भरविण्यात येतो. त्यानिमित्ताने शहरी भागात फुललेल्या फुलांची आणि अन्य माहिती नागरिकांना मिळते आणि तीन-चार दिवस पर्यावरणाच्या प्रबोधनात जातात. काही कारणामुळे गेल्या आठ वर्षांपासून खंड पडलेला पुष्पोत्सव पुन्हा सुरू झाला आहे. गेल्यावर्षीनंतर यंदाही राजीव गांधी भवनात भरलेल्या या उत्सवाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्पर्धात्मक पुष्पप्रदर्शन असल्याने विविध आठशे स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. यानिमित्ताने गुलाबासह विविध फुलांचे प्रकार, बहुमोसमी तसेच वर्षातून एकदा फुलणारी फुले प्रदर्शनात आहेत, परंतु फुलांच्या सजावटीने विविध प्रकारच्या रचना सादर करण्यात आल्या आहेत. जपानी पुष्परचनेबरोबरच फुलांच्या रांगोळ्यादेखील असून, फळे आणि फळभाज्यांचे विविध प्रकारदेखील सादर करण्यात आले आहेत. भाज्यांच्या मदतीने देखावे तयार करण्यात आले आहेत. हे सर्व पाहण्यासाठी शुक्रवारी (दि. २१) आबालवृद्धांची गर्दी झाली होती. प्रसाद दुसाने यांच्या सहकाऱ्यांच्या साथसंगतीने पुष्पोत्सवात अधिकच रंग भरले. फ्लॉवर टॉवरसह अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंटदेखील उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन वृक्ष प्राधिकरण समितीचे सभापती तथा आयुक्त राधाकृष्ण गमे, उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले तसेच समितीच्या सदस्यांनी केले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका