तालुक्यातील शेतकºयांनी रिमझिम पावसावर खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. तालुक्यात केवळ १७५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ७६ हजार ९३० हेक्टरवरील खरीपाची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकºयांनी खरीप पिकांवर रोटर फिरवण्यास सुरूवात केली आहे. यंदा खरीपाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर शेती व्यवसायाला पुरक समजला जाणारा दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे.तालुक्यात खरीपाचा २ लाख १२ हजार ३२ तर रब्बीचा २ लाख ३८ हजार २१ मेट्रीक टन चारा शिल्लक होता. तालुक्यातील १ लाख ४९ हजार ९२० इतक्या पशुधनासाठी प्रतिमहिना २ लाख ४३ हजार ८९ मेट्रीक टन चाºयाची आवश्यकता असते. मात्र सद्यस्थितीत ३१ आॅगस्ट पर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. आॅगस्ट महिना उजाडूनही तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. तालुक्याची सरासरी पर्जन्यमान ४४० मिली मीटर आहे. यंदा १७५ मिली मीटरच पाऊस पडला आहे. गिरणा नदी किनार व पाट कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पिके तग धरुन आहेत.आठवड्याभात दमदार पाऊस झाला नाही तर खरीपाचा हंगाम वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर ओढावण्याची शक्यता आहे.
मालेगाव तालुक्यात चाराटंचाई; पशुधन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:47 IST