शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पिके वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:41 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, मूग बहरला आहे, तर काही ठिकाणी टमाट्याची खुडणी सुरू आहे.

ठळक मुद्देपावसाची रिपरिप : शेतात पाणी साचले; टमाट्याची खुडणी सुरू

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, मूग बहरला आहे, तर काही ठिकाणी टमाट्याची खुडणी सुरू आहे. काही भागात फ्लॉवरची निंदणी शेतकरी सहकुटुंब करीत आहेत. सध्या सुरू असलेली पावसाची रिपरिप आणि मजुरांचा वानवा असल्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरीच सर्व कामे उरकावी लागत आहेत. काही ठिकाणी अजूनही शेतातून पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे तेथील पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.एकलहरे गाव, हिंगणवेढे परिसरात द्राक्षबागांची छाटणी सुरू झाली आहे. सामनगाव परिसरात सखल भागात अति पावसामुळे शेतांमध्ये पाणी उफाळून आल्याने काही प्रमाणात पिके पाण्याखाली आहेत. ही पिके चिखल व पाण्यामुळे सडून जाण्याची भीती सामनगावचे शेतकरी पप्पू राणू जगताप यांनी व्यक्त केली. गंगावाडी शिवारात मूग आणि भुईमूग ही पिके बहरू लागली आहेत, तर उसाला पुरेसा पाऊस मिळाल्याने त्याची वाढही जोमाने होऊ लागली आहे.एकलहरे परिसरातील सामनाव, चाडेगाव, कोटमगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चांदीगरी, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने नद्या, नाले, विहिरी, तलाव तुडुंब भरले आहेत. काही ठिकाणी अजूनही शेतातून पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे तेथील पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.एकलहरे, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी या भागात सोयाबीन पिकाला शेंंगा आल्या आहेत. या शेंगातून दाणे भरण्याची प्रक्रि या सुरू आहे. सोयाबीनची पिके उभी आहेत. अजून सुमारे दीड महिन्यानंतर सोयाबीन काढणीस येईल, असे शेतकरी तानाजी ढोकणे यांनी सांगितले. पूर्व भागात काही ठिकाणी काकडीचे पीकही जोमाने बहरले आहे. काकडी लावून सुमारे महिना भराचा कालावधी उलटला. काकडीचे वेल पसरून बहर चांगला येण्यासाठी सरीच्या दोन्ही टोकांवर बांबू खोचण्यात आले आहेत.मूग, भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणातसामनगाव, हिंगणवेढे, जाखोरी, चांदगिरी या भागांत टमाटे लागवड होऊन सुमारे तीन महिने झाले आहेत. सध्या टमाट्याचा खुडवा सुरू आहे. गवार, भेंडी, शेपू, पालक, मेथी, कांदापात या भाज्यांची काढणी करून नाशिकरोड, नाशिक येथील भाजीबाजारात विक्र ीसाठी नेला जातो. कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चाडेगाव शिवारात अनेकांनी मूग व भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सुमारे दीड ते दोन महिन्यांनी ही पिके काढण्यास येतील.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती