शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘सेवाकुंज’ घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती

By admin | Updated: October 20, 2015 21:07 IST

‘सेवाकुंज’ घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर थांब्यासमोर रस्त्यावरच पालक आपल्या लहान बालकांना घेऊन उभे राहात असतात. त्यामुळे पंचवटी येथील सेवाकुंज येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वडाळा-पाथर्डी रस्ता लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटीपर्यंत रस्ता तयार करण्यात आला होता. यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि दोन्ही बाजूस पादचाऱ्यासाठी पदपथ तयार करण्यात आला आहे. वर्षापूर्वी कलानगर ते पाथर्डीगावापर्यंत राहिलेल्या रस्त्याचे कामास सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच दुभाजकही टाकण्यात आले आहे. श्रद्धा विहार कॉलनीमध्ये दोन महाविद्यालये व एक माध्यमिक विद्यालय, तर समोर एक प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व एक महाविद्यालय आहे. त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. तेथे दुभाजकांस छोटा पंक्चर टाकण्यात आला आहे. हाकेच्या अंतरावरच असलेल्या सार्थकनगर बसथांब्यासमोर इंग्रजी प्राथमिक विद्यालय असून, तेथे दुभाजकास मोठा पंक्चर ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी शाळेची संख्या जास्त तेथे छोटा पंक्चर, तर जेथे एकच शाळा तेथे मोठा पंक्चर टाकण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी असे होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.सार्थकनगर बसथांबासमोर असलेल्या शाळेस वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने सकाळ व दुपार सत्रात शेकडोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे पालक व व्हॅनधारक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळा सुटण्याच्या आधी सुमारे अर्धा तास आधीच वडाळा-पाथर्डी रस्त्यावरच आपली वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीस रस्ता अरुंद पडत आहे; परंतु शाळा सुटल्यावर विद्यार्थी पळत येऊन आपल्या पालकांकडे आणि व्हॅनकडे जातात. त्यामुळे पंचवटी येथील सेवाकुंज येथे झालेल्या दुर्दैवी घटनेची आठवण होते. शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रस्त्यावरच वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा का उभारत नाही? असा प्रश्न निर्माण होतो. (वार्ताहर)