शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहून गेल्याची भीती

By admin | Updated: July 15, 2017 00:18 IST

पंचवटी : परिसरात पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागल्याने मोरेमळा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याजवळून रस्ता ओलांडत असताना एक शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : परिसरात शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागल्याने मोरेमळा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याजवळून रस्ता ओलांडत असताना एक शाळकरी मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत संबंधित मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू केले. परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत मुलाला शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले नाही. मोरे मळा परिसरात नाल्याजवळून रस्ता ओलांडत असताना एक १० वर्षाचा मुलगा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. परिसरातील काही व्यक्तींनी ही घटना पाहिल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली नाल्यातील वाहत्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने संबंधित मुलगा वाहून गेल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांनी वर्तविला. पावसामुळे नाल्याच्या पाण्याची पातळी वाढली असताना संबंधित मुलगा नाल्याला लागून असलेल्या खडकावरून रस्ता ओलांडत होता. यावेळी त्याचा पाय घसरून पाण्यात पडला व पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. तो मुलगा नाल्यात वाहून जात असल्याचे परिसरातील काही महिला तसेच मनपा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी बघितले. त्यांनी आरडाओरडा करीत परिसरात मदतीसाठी धावा केला. परंतु पाण्याचा प्रवाह अधिक तीव्र असल्याने मदतकार्य करता आले नाही. अग्निशमन दल स्थानिक नागरिकांनी वाहून गेलेल्या मुलाचा शोध संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शोधकार्यात यश आले नाही. दरम्यान, संध्याकाळी या भागात कोणत्याही पालकांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, उशिरापर्यंत वाहून गेलेल्या मुलाला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते.