शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘चिंगी’च्या चाव्याची भीती अन‌् अल्पवयीन मुलाकडून गुन्ह्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:13 IST

इंदिरानगर : वासननगर भागातील एका चाळीत राहणाऱ्या महिलेचे १२ ग्रॅमचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने घरातून लांबविल्याची घटना घडली होती. या ...

इंदिरानगर : वासननगर भागातील एका चाळीत राहणाऱ्या महिलेचे १२ ग्रॅमचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने घरातून लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी शक्कल लढविली. पोलीस ठाण्याचे पाळीव श्वान ‘चिंगी’ला संशयित रहिवाशांसमोर आणले आणि ‘चोरट्यास ओळख, चिंगी...’ असे फर्मान सोडले. यावेळी उपस्थितांमधील एका अल्पवयीन मुलाने श्वान चावा घेईल, या भीतीपोटी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरलेले मंगळसूत्र काढून पोलिसांना दिले.

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी एक पांढऱ्या रंगाचे भटके श्वान आले होते. या श्वानाला पोलिसांचा लळा लागला आहे. पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्या श्वानाचा लळा लागला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी त्याच्यासाठी खास ‘डॉग फुड’ची बॅगच आणून ठेवली आहे. हे श्वान प्रशिक्षित नसले तरीदेखील पोलिसांच्या सहवासात राहून हे श्वानही चोर अन‌् साव ओळखू लागले आहे.

राणेनगर पोलीस चौकीत महिला तक्रार देण्यासाठी आल्या असता त्याठिकाणी असलेले हवालदार सुरेश भोजने व पंकज हासे यांनी त्यांची तक्रार घेतली आणि सर्व चाळीतील रहिवाशांना पोलीस ठाण्याच्या इमारतीत हजर राहण्यास सांगितले. रहिवासी आले असता मंगळसूत्र चोरी केल्याची कोणीही कबुली देण्यास तयार नव्हते. घरातील कपाटावर काढून ठेवलेले मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले होते.

पोलिसांनी ‘चिंगी’ला जवळ बोलावून घेत शक्कल लढविली. श्वान प्रशिक्षित नाही, हे केवळ पोलिसांना माहीत आहे; मात्र रहिवाशांना त्याची कल्पना नसल्याने त्या युक्तीचा वापर करत भोजने यांनी ‘आता, हे श्वान तुमच्यामधूनच चोराला ओळखून त्याच्याकडून मंगळसूत्र असल्याचे दाखवून देईल’ असे सांगितले. यामुळे उपस्थित सर्वच रहिवाशांची भंबेरी उडाली. यावेळी एका अल्पवयीन मुलाने श्वान आपल्याला चावा घेईल, या भीतीपोटी गुन्ह्याची कबुली देत मी मंगळसूत्र चोरी केले आहे, घरी कोणी नव्हते, त्यावेळी कपाटावरून मंगळसूत्र गायब केल्याचे सांगितले आणि पटकन मंगळसूत्र काढूनही दिले. पोलिसांनी लढविलेली ही शक्कल गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पूरक ठरली.

---

फोटो आर वर ०६डॉग नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

060221\06nsk_12_06022021_13.jpg

===Caption===

इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पाळीव श्वान ‘चिंगी’