शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पालकांमध्ये संताप : नवीन इमारत बांधण्याच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष तोरणानगर शाळेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:37 IST

सिडको : येथील तोरणानगर भागातील महापालिकेच्या शाळेला घरघर लागलेली असून, सदर शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर शाळेला धोकादायक ठरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या भूमिकेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप शाळेच्या स्लॅब धोकादायक

सिडको : येथील तोरणानगर भागातील महापालिकेच्या शाळेला घरघर लागलेली असून, सदर शाळेचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर शाळेला धोकादायक ठरविण्यात आले आहे. यांनतर मनपा आयुक्तांनीही पाहणी केल्याने शाळेची दयनीय अवस्था पाहून त्यांनीही धोकादायक शाळेच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांंना आदेशित केले असले तरी यास अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही याकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ तोरणानगर येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक १०४, १०७ व ऊर्दू शाळेची इमारत आहे. या शाळेची इमारत बांधून सुमारे २७ वर्षे झाली असून, सद्य:स्थितीत या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत ही पावसाळ्यात गळत असून, शौचालयाची दुरवस्था झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने शाळेच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबरोबरच शाळेच्या स्लॅब धोकादायक झाला असून, भिंतींना तडे गेले आहे. यामुळे गेल्या काही महिण्यांपूर्वी शाळेचे स्ट्रक्चर आॅडिट केल्यानंतर धोकादायक ठरविण्यात आले आहे. याबाबत प्रभागाच्या शिवसेना नगरसेवक रत्नमाला राणे यांनीही शाळेच्या दुरवस्थेबाबत मनपा आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. तसेच प्रभाग व महासभेत आवाज उठविला असतानाही महापालिकेच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असल्याने पालकवर्गाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ मनपा प्रशासनातील अधिकाºयांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही नगरसेवक राणे यांनी केला. इमारत बांधण्याबाबत बांधकाम विभाग चालढकल करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नगरसेवक राणे यांनी पुन्हा येत्या महासभेत हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.