शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीशिवाय फटाके विक्रीचे गाळे

By admin | Updated: October 11, 2014 21:46 IST

परवानगीशिवाय फटाके विक्रीचे गाळे

 

नाशिक : एरव्ही गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल्स उभारण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची प्रतीक्षा करणाऱ्या महापालिकेने फटाके विक्रीसाठी जागा निश्चित करताना मात्र पोलिसांना विचारणाच केलेली नाही. त्यामुळे जागा लिलाव केल्यानंतरही हे लिलाव रद्द केले जाऊ शकतात, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फटाके व्यावसायिक बुचकळ्यात पडले आहेत.महापालिकेच्या वतीने रस्त्यावर गाळे उभारण्यासाठी परवानगी देताना पोलिसांकडून त्याची रूजवात केली जाते. वाहतुकीला अडथळे नसलेल्या ठिकाणीच अशा प्रकारे परवानगी दिली जाते. तसेच सुरक्षिततेबाबतही पोलीस यंत्रणा जागा तपासून निर्णय घेत असते. गोल्फ क्लब मैदानावर फटाके विक्रीचे गाळे लावताना ईद असल्यास पोलीस परवानगी नाकारतात. अशाच प्रकारे शासकीय रुग्णालयाच्या भिंतीलगत म्हणजेच शांतता क्षेत्रात गणेशमूर्तींचे गाळे उभारणीसाठी परवानगी देताना पोलिसांची परवानगी यासाठीच घेतली जाते. परंतु आता फटाके विक्रीच्या ३२ जागा निश्चित करताना महापालिकेने पोलिसांची परवानगीच घेतलेली नाही.महापालिकेने येत्या १६ आणि १७ तारखेला गाळ्याचे लिलाव ठेवले आहेत. त्यासंदर्भात केलेल्या अटी-शर्तींमध्ये सदरचे लिलाव हे पोलिसांच्या ना हरकत दाखल्यांच्या अपेक्षेवर काढण्यात येत असून, ज्या गाळ्यांना पोलीस हरकत घेतील, त्या गाळ्यांचा लिलाव रद्द करण्यात येतील, असे आयुक्तांनी नमूद केले आहे. त्यामुळे गाळ्यांसाठी परवानगीच घेतली नसेल, तर व्यावसायिकांना लिलावास भरीस पाडून नंतर पुन्हा जागेची शोधाशोध करण्यासाठी भ्रमंती करण्याची गरज काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)