शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाचवर्षीय बालिकेचा अत्याचार करून खून आजीसह पित्यावर गुन्हा

By admin | Updated: May 21, 2017 02:16 IST

दिंडोरी/वणी : दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी येथे पाचवर्षीय बालिकेवर जन्मदात्या पित्याने दारूच्या नशेत अत्याचार करून नात्याला काळिमा फासला

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/वणी : दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी येथे पाचवर्षीय बालिकेवर जन्मदात्या पित्याने दारूच्या नशेत अत्याचार करून नात्याला काळिमा फासला. ही घटना उघड होऊ नये म्हणून आजीनेच नातीचा गळा दाबून खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, झोपेत आपल्या कुशीतून मुलीला उचलून नेत अत्याचार व खून केल्याचा बनाव आजीने रचला; मात्र पोलिसांनी काही तासात या घटनेचा पर्दाफाश करीत नराधम पिता व आजी यांना ताब्यात घेतले आहे.जवळके वणी येथे संशयित आरोपी सचिन अशोक शिंदे (२४) हा रात्री लग्नाच्या वरातीतून दारू पिऊन आला. त्याने आपल्या आईजवळ म्हणजेच पीडितेच्या आजी जवळ झोपलेली पोटच्या ५ वर्षीय मुलीला झोपेतच उचलून नेले व बाजूच्या खोलीत या चिमुरडीवर अत्याचार केला. सदर प्रकार आजी अनुसया हिच्या लक्षात आला. घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून तिने पीडित चिमुरडीची गळा आवळून हत्या केली व तिचा मृतदेह जवळच असलेल्या शाळेच्या पाठीमागे फेकून दिला. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मृतदेह पुन्हा घरी आणला व चुलत भावासबोलावून पीडितेला दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचा बनाव केला. त्यानंतर आजी अनुसया अशोक शिंंदे (४८) हिने पोलिसांत धाव घेऊन कुणीतरी अज्ञात आरोपीने माझ्याजवळ झोपलेल्या पाचवर्षीय नातीला झोपेतून उचलून नेले व शाळेच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची बनावट फिर्याद दिली. या फिर्यादीवरून वणी पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३०२, ३७६ (१), २०९, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात श्वानपथकाने मृतदेह पडलेल्या ठिकाणापासून पीडित मुलीच्या घराचीच दिशा दाखवल्याने पोलीस तपासाला वेगळे वळण मिळाले. कळवणचे विभागीय पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी सचिन शिंदे याने केलेल्या कूकर्माची कबुली दिली. त्यानंतर संशयित आरोपी सचिन यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास कळवणचे विभागीय पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.एल. पवार करीत आहेत.