वणी : करंजवण धरण परिसरात राहणाऱ्या एका मुलाने वडिलांवर हल्ला केल्याने ते जागीच ठार झाले़ दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरण परिसरात कर्मचाऱ्यांची निवासी कॉलनी आहे. श्याम दगू बागुल हे पाटबंधारे विभागात वायरमन म्हणून कार्यरत होते. निवासी कॉलनी परिसरात तांत्रिक बिघाड झाल्याने या ठिकाणचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. वीजपुरवठा खंडित का? केला याचा जाब विचारण्यासाठी घटनास्थळी भावड्या गांगुर्डे नामक व्यक्ती या ठिकाणी आली असता चर्चेदरम्यान भावड्या गांगुर्डे व विजय श्याम बागुल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद मिटल्यानंतर विजय बागुल याने आपले वडील श्याम बागुल यांना विचारणा केली की माझे भांडण सोडविण्यासाठी तुम्ही का आला नाही? या मुद्द्यावरून बापलेकात वाद झाला व संतापाच्या भरात विजयने वडील श्याम बागुल यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने श्याम बागुल यांचा अंत झाला. घटनेची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ काही तासांच्या अवधीत संशयिताला जेरबंद केले़ मयताची पत्नी व संशयिताच्या आईच्या फिर्यादीवरून विजयविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे़पतीच्या मृत्यू प्रकरणात पोटच्या मुलाविरोधात तक्र ार देण्याची दुर्दैवी वेळ असहाय्य मातेवर आल्याने करंजवण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शांतता पसरली आहे. (वार्ताहर)
मुलाकडून वडिलांचा खून
By admin | Updated: March 15, 2016 00:31 IST