शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षास मंगळवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:26 IST

पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पंधरवडा अर्थात पितृपक्षास मंगळवारपासून (दि.२५) प्रारंभ होत आहे. श्राद्ध पक्ष, पिंडदान, नैवेद्य, भोजन, दानधर्म, सामजिक उपक्रमांद्वारे पितरांचे स्मरण करण्यावर लोक भर देणार असून, श्राद्धपक्षासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ गजबजून गेली आहे. केळीची पाने, पत्रावळी, काळे तीळ, फुले, फळे, पितृपक्षाच्या भाज्या आदी अनेक गोष्टींची दुकाने बाजारात दिसत आहेत.

नाशिक : पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पंधरवडा अर्थात पितृपक्षास मंगळवारपासून (दि.२५) प्रारंभ होत आहे. श्राद्ध पक्ष, पिंडदान, नैवेद्य, भोजन, दानधर्म, सामजिक उपक्रमांद्वारे पितरांचे स्मरण करण्यावर लोक भर देणार असून, श्राद्धपक्षासाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठ गजबजून गेली आहे. केळीची पाने, पत्रावळी, काळे तीळ, फुले, फळे, पितृपक्षाच्या भाज्या आदी अनेक गोष्टींची दुकाने बाजारात दिसत आहेत.  माता-पिता तसेच निकटवर्तीय हयात असताना त्यांची सेवाशुश्रुषा आपण धर्मपालन म्हणून करतो. त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. या कर्तव्यपूर्तीची सुसंधी श्राद्धाच्या निमित्ताने मिळते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्यूतर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक मानले जाते. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त इच्छांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे. पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे. भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतच्या पितृपक्ष म्हणतात. या काळात पितर आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे.या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. असे विविध हेतू श्राद्धविधी करण्यामागे आहेत. त्याची पूर्तता करण्याचे नियोजन घरोघरी पहायला मिळत आहे. याशिवाय काशी, प्रयाग, मातृगया, पितृगया इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन सर्व पितरांप्रीत्यर्थ श्राद्ध करण्याचेही नियोजन काही ठिकाणी पहायला मिळत आहे. या पारंपरिक श्राद्धविधींबरोबरच अनेक लोक आपल्या पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनाथाश्रमात, वृद्धाश्रम, बालकाश्रम आदी ठिकाणी उपयोगी वस्तूंचे दान देण्यावर भरही देत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम