शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत पिता ठार; तीन मुले जखमी

By admin | Updated: May 20, 2014 00:13 IST

वलखेड फ ाट्याजवळील घटना : जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश

वलखेड फ ाट्याजवळील घटना : जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेशनाशिक : मामाच्या गावी गेलेल्या मुलांना घरी घेऊन येत असताना वलखेड फ ाट्यानजीक असलेल्या पुलाजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत मातेरेवाडी येथील सुनील बाळासाहेब गटकळ यांचा मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले व भावाचा मुलगी जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथे राहणारे सुनील बाळासाहेब गटकळ (३५) हे सोमवारी सकाळी मामाच्या गावी गेलेल्या मुलांना प्रतीक सुनील गटकळ (९), यश सुनील गटकळ (६) व प्रियांका अरुण गटकळ (१०) यांना आणण्यासाठी दुचाकीवर गेले होते़ दुपारी एक वाजेच्या सुमारास मातेरेवाडीकडून दिंडोरीकडे येत असताना वलखेड फ ाट्याजवळील पुलावर समोरून आलेल्या ट्रकने (क्र. एमएच ०४, सीपी-७७६७) त्यांना जोरदार धडक दिली़ या धडकेमुळे सुनील गटकळ व मुले दुचाकीवरून बाजूला फे कली गेली़ या अपघातात सुनील गटकळ यांच्या उजव्या खांद्यास व डोक्यास जबर मार लागला, तर प्रतीक, यश व प्रियांका या तिन्ही मुलांचे उजवे पाय फ्रॅ क्चर झाले़ दरम्यान, अपघातानंतर अधिक उपचारासाठी गटकळ यांना प्रथम दिंडोरीच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ़ शेवाळे यांनी तपासून मयत घोषित केले़या अपघातात जखमी झालेले प्रतीक सुनील गटकळ (९), यश सुनील गटकळ (६) व प्रियांका अरुण गटकळ या तिघांचाही उजवा पाय मोडला असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, दिंडोरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)