शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

निफाडच्या पूर्व भागातील रस्ते दुरुस्तीसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:55 IST

निफाडच्या पूर्व भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.६) मरळगोई चौफुलीवर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, आमदार छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकांनी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

लासलगाव/देवगाव : निफाडच्या पूर्व भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.६) मरळगोई चौफुलीवर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान, आमदार छगन भुजबळ यांच्या स्वीय सहायकांनी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.भरवस - लासलगाव, मरळगोई-विंचुर, गोंदेगाव-वाहेगाव या रस्त्यांची अत्यंंत दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. तसे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागालाही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, शेतकरी-शेतमजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लासलगाव-भरवस रस्त्याचे अर्धवट बांधकाम वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. तसेच रस्त्यांवरील काटेरी झुडपे अपघातास निमंत्रण ठरत आहेत. दरम्यान, छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, संभाजी पवार, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या रस्त्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ललित दरेकर,सामाजिक कार्यकर्ते अशोकबाबा आहेर,पंचायत समिती सभापती राजेश पाटील, उपसभापती गुरु देव कांदे, सदस्य पंडित आहेर, शिव सुराशे, शहाजी राजोळे, सोमनाथ गांगुर्डे, शंकर संगमनेरे, चारोस्कर, भाऊ घुमरे, वाहेगाव सोसायटी उपसभापती प्रदीप तिपायले, पंचायत समितीचे माजी सदस्य राजाभाऊ दरेकर,प्रकाश पाटील, वाहेगाव ग्रामपंचायत उपसरपंच दशरथ आहेर, गोंदेगाव ग्रामपंचायत सरपंच शांताराम कांगणे, उपसरपंच विक्र म भोसले, मरळगोई सरपंच रामदास जगताप, शिवसेना ग्राहक संरक्षण समिती तालुकाप्रमुख योगेश काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना