शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नावर उपोषण

By admin | Updated: May 16, 2017 23:51 IST

स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : न्यायालयाने वेळोवेळी निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आश्रमशाळांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. न्यायालयाचे निकाल व शासन निर्णयांची कडक अंमलबजावणी करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.याबाबत आदिवासी विकास आयुक्तांना शिक्षक संघटनेने निवेदन दिले आहे. त्यानुसार शालेय विभाग व वसतिगृह विभाग स्वतंत्र करून शाळेची वेळ ११ ते ५ निश्चित करावी. आदिवासी प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या १४३३ कर्मचाऱ्यांना मागील थकबाकी अद्याप मिळालेली नाही. तसेच या व्यतिरिक्त काही कर्मचारी शिल्लक आहेत का? याचीदेखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, नियुक्तीनंतर तीन वर्षांत हे शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकतात. यानुसार कार्यवाही करून प्रलंबित शिक्षक मान्यता देण्यात यावी. कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते मिळण्याचा अधिकार असताना नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे मुख्याध्यापक व अधीक्षक यांचे निवासस्थान आवारात असूनदेखील त्यांना घरभाडे भत्ता व प्रोत्साहन भत्ता दिला जात नाही. या बेमुदत उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष लोकेश पाटील, अध्यक्ष भरत पटेल, महिला आघाडीच्या लता पाटील, कार्यवाह रमेश चव्हाण, उपाध्यक्ष विजय पाटील आदी सहभागी झाले होते. मनमानी पद्धतीने वेतन कपातनाशिकमधील अनुदानित आश्रमशाळांतील काही संस्थाचालक मनमानी पद्धतीने कर्मचारी वेतन कपात करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच आश्रमशाळांतील मुली व मुलांसाठी स्वतंत्र प्रकल्प अधिकारी दर्जा असलेली स्त्री अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या संस्थाचालक, अधिकाऱ्यांविरु द्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.