शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

By admin | Updated: January 10, 2016 22:29 IST

मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

मालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, हा केवळ फार्स ठरू नये. तशी अनेकदा मोहीम राबवली जाते. काही काळानंतर मोहीम बासनात गुंडाळण्यात येते व शहराची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ होते. महापालिकेच्या या मोहिमेचे शहरात स्वागत होत असले, तरी यामुळे केवळ घोषित केलेल्या परिसरातील स्वच्छता मोहिमेसह इतर ठिकाणचीही सफाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.शहरात स्वच्छतेचा प्रश्न पाचवीला पुजला आहे. महापालिकेने कोट्यवधीचा ठेका साफसफाईसाठी ठेकेदारास दिला आहे. परंतु त्या ठेकेदाराच्या कामाबाबत सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहण्यास मिळते. पालिकेच्या चारही प्रभागांतील असंख्य वॉर्डांमधील साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कामांचे नियोजन करण्यात येते; परंतु हे नियोजन भरकटलेले असते. त्यामुळे वॉर्डाच्या सफाईचा प्रश्न गंभीर होतो. गटारीतून काढलेला गाळ व कचरा वसाहतींच्या रस्त्यांवर मुख्य चौकात अनेक दिवस पडलेला दिसतो. घंटागाडी वॉर्डात तीन दिवसाआड येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही वॉर्डांत सफाई महिला सकाळी रस्ते झाडतात व तो कचरा रस्त्याच्या कडेला ढिगारे करून लावतात. हा कचरा दिवसभर तेथेच पडलेला असतो. नंतर रस्त्यावर पुन्हा पसरतो. याबाबत तक्रारी विशेष प्रभाग कार्यालय-१ मध्ये केल्या. परंतु तेथून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होतो, तर काही परिसरात अद्याप गटारी नाहीत त्या ठिकाणी कचरा उचलणारे मोठे ट्रॅक्टर्स कचरा उचलण्यासाठी टाळाटाळ करतात. परिसरातील अनेक बंगले व सोसायटीमधील बगीचांचा पालापाचोळा, झाडांच्या फांद्यासारखा कचरा हे ट्रॅक्टर्सवाले उचलण्यास असमर्थता दर्शवतात. हे काम उद्यान विभागाचे असल्याचा सल्ला देतात. यामुळे हा बगीचा साफसफाईचा कचरा परिसरात अनेक दिवस पडलेला असतो. यामुळे बारीक चिल्टे, मच्छरांचा त्रास परिसरात सुरू असतो. (प्रतिनिधी)