शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

टोमॅटोची रोपटे जळू लागल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:19 IST

मानोरी : येवला तालुक्यात सुमारे पाच महिन्यापासून दुष्काळाच्या यातना सहन करत आलेल्या भागात जून महिन्याच्या सुरु वातीलाच मान्सून पूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा तात्पुरता सुखावला असून या मान्सून पूर्व पावसाच्या जोरावर तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड फाटा, खडकीमाळ आदी परिसरात शेतकरी वर्ग टोमॅटो पिकाची सध्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत असताना लागवड केलेली नवीन टोमॅटोची रोपटे अचानक जळी पडू लागल्याने टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा धास्ती उभी राहिली असून दुसºयांदा टोमॅटोची लागवड करण्याची परिस्थिती ओढावते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे मिल्चंग पेपरच्या आच्छादन मूळे टोमॅटो पिकासाठी पाणी कमी प्रमाणात लागणार

मानोरी : येवला तालुक्यात सुमारे पाच महिन्यापासून दुष्काळाच्या यातना सहन करत आलेल्या भागात जून महिन्याच्या सुरु वातीलाच मान्सून पूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा तात्पुरता सुखावला असून या मान्सून पूर्व पावसाच्या जोरावर तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड फाटा, खडकीमाळ आदी परिसरात शेतकरी वर्ग टोमॅटो पिकाची सध्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात व्यस्त झाल्याचे दिसून येत असताना लागवड केलेली नवीन टोमॅटोची रोपटे अचानक जळी पडू लागल्याने टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा धास्ती उभी राहिली असून दुसºयांदा टोमॅटोची लागवड करण्याची परिस्थिती ओढावते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुखेड फाटा परिसरात मागील चार ते पाच महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती असल्याने तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे हजारो हेक्टर शेती ओस पडून होती. हीच परिस्थिती अद्यापही काहीशी तशीच आहे. शेतकरी खरीप हंगामातील पिकांची आण िटोमॅटो पिकाची लागवड करण्यास शेतकरी वर्ग मागे राहिला नसून खरीप हंगामातील जवळपास मशागती पूर्ण झाल्या असून टोमॅटो पिकाची मात्र लागवड सुरू असल्याचे दिसून येत आहे मानोरी, देशमाने, मुखेड फाटा परिसरात ट्रॅक्टरच्या सहायाने सरी पाडून मिल्चंग पेपरचे आच्छादन प्रामुख्याने शेतकरी करत आहे. मिल्चंग च्या आच्छादनात ड्रीप पसरवून टोमॅटो पिकासाठी पाण्याची सोय करत असून मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत ड्रीप मूळे होणार असून मिल्चंग मुळे टोमॅटो झाडाच्या बुडाजवळ ऊन असतानाही गारवा राहणार आहे. आण िखुरपणी, निंदणीचा देखील खर्च या मिल्चंग आच्छादन मुळे होणार आहे. टोमॅटो ची रोपटे खरेदी करण्यासाठी निफाड तालुक्यातील उगाव परीसर सर्वत्र प्रसिद्ध असून येवला तालुक्यातील अनेक शेतकरी उगाव येथून टोमॅटो रोपटे खरेदी करण्यासाठी दररोज गर्दी करत आहेत. टोमॅटो च्या एका रोपट्यासासाठी 1 रु पया 30 पैसे ते दीड रु पयांपर्यंत एक रोपटे विकत भेटत आहे.मिल्चंग पेपरच्या आच्छादन मूळे टोमॅटो पिकासाठी पाणी कमी प्रमाणात लागणार असून दिवस भर उन्हाची तीव्रता असली तरी मिल्चंग पेपर च्या आच्छादन मध्ये ड्रीप असल्याने टोमॅटो झाडाच्या बुडाजवळ गारवा राहणार आहे. परंतु ही नव्याने लागवड केलेल्या टोमॅटो ची रोपटे अचानक जळी पडू लागल्याने मोठी धास्ती निर्माण झाली आहे.--------- निखिल दुघड, शेतकरी, मुखेड फाटा.(फोटो १६ मानोरी): मुखेड फाटा येथे सुरू असलेली मिल्चंग पेपरच्या आच्छादनावर सुरू असलेली टोमॅटो लागवड.