शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तळवाडे (त्र्यंबक) येथे कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्त्या

By admin | Updated: June 27, 2014 00:19 IST

तळवाडे (त्र्यंबक) येथे कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्त्या

 

त्र्यंबके श्वर : तळवाडे (त्र्यंबक) येथील शिवाजी शांताराम बोडके (३५) याने आपल्या बांधावरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मंगळवारी रात्री ही आत्महत्त्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सकाळी ७.३०च्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शेतीच्या कर्जामुळे आत्महत्त्या केली असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्र्यंबकपासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर मयत शिवाजी त्याचे तीन भाऊ, आई असा सर्व एकत्र परिवार राहत आहे. मंगळवारी रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपायला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर रात्री केव्हा तरी हा प्रकार घडला असावा. दरम्यान, मयत शिवाजी यांच्यावर तळवाडे (त्र्यंबक) वि.का.स.संस्थेचे जिल्हा बँकेमार्फत पीककर्ज रुपये ११ लाख ५६ हजार अधिक व्याज असे कर्ज, महिंद्रा कंपनीकडून घेतलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर (फायनान्सर महिंद्रा) यापैकी उर्वरित हप्ते हे कर्ज होते. मृताच्या खिशात चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठीत ‘जीवनाला कंटाळून आत्महत्त्या करीत आहे. माझ्या आत्महत्त्येशी घरातील कुणाचाच संबंध नाही, असे नमूद केले आहे. आत्महत्त्या करण्याच्या कारणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गणेश परदेशी, वाजे आदि तपास करीत आहेत. या आत्महत्त्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)