शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: April 13, 2017 00:10 IST

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

नाशिक : जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज मिळत नसलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. १२) जिल्हा बॅँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. कर्जाची परतफेड केल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली.ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना २५ एप्रिलपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल, असे आश्वासन अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिले.यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. जिल्हा विविध विकास सेवा सहकारी सोसायटी संघटनेच्या वतीने जिल्हा बॅँकेतील सभागृहात हे आंदोलन करण्यात आले. ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे जिल्हा बॅँकेने आवाहन केले, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज भरले. परंतु, कर्ज भरणा होऊनदेखील कर्ज पुरवठा का केला जात नाही अशी विचारणा शेतकऱ्यांनी केली. यावर बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाठ यांनी कर्ज पुरवठ्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्र मक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट ठिय्या मांडला. कर्ज द्या नाहीतर, खुर्च्या खाली करा अशी घोषणबाजी केली. बॅँकेचे काय झाले ते सांगू नका आधी कर्ज कधी देणार असे सांगा,अशी भूमिका घेत शेतकऱ्यांना शिरसाठ यांना धारेवर धरले. शिरसाठ यांना घेराव घालीत गोंधळ सुरू केला. या गोंधळात बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे सभागृहात दाखल झाले. अध्यक्ष दराडे दाखल झाल्यानंतर, शेतकऱ्यांनी बॅँकेच्या परिपत्रकानुसार ३१ मार्चपयॅँत कर्जफेड करणाऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करावा. हे कर्ज २५ एप्रिलपूर्वीच मंजूर करावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी राज्य बॅँकेतील ठेवी मुक्त करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज दिले जाणार असल्याचे आश्वासन दराडे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी संचालक संदीप गुळवे, गणपतराव पाटील, संघटनेचे निमंत्रक राजू देसले, विष्णूपंत गायखे, सुरेश रायते, अशोक आडके, संपतराव वक्ते, राजराम रायते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, ज्ञानेश्वर साळवे, शांताराम नागरे, किरण धात्रक, शशिकांत साळवे, कैलास ताजनपुरे, नामेदाव बोराडे, रमेश जेजुरकर, मधुकर शिंदे, विलास कडभाने, शंकर वायचळे, भास्कर उगले, ज्ञानेश्वर गायधनी, किरण गायधनी, तुकाराम शिंदे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)