शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाकीखापरीजवळ शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Updated: January 28, 2017 00:32 IST

घोटी : अखेर विसर्ग बंद; अधिकाऱ्यांना निवेदन

 घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी, कोरपगाव धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग त्वरित बंद करण्यासाठी परिसरातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते देवराम मराडे यांच्या नेतृत्वाखाली थेट धरणावर जाऊन ठिय्या आंदोलन करून पाण्याचा विसर्ग बंद करून वाकीखापरी प्रकल्प उपअभियंता हरिभाऊ गिते यांना निवेदन दिले. पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी ठेवावे, अशी मागणी वेळोवेळी करूनही संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत होता. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे.वाकी खापरी, कोरपगाव धरणाचे पाणी परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाके घोटी, धानोर्ली या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी ठेवण्यात यावे, अशी मागणी होती. मात्र गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने वरील गावातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक मोटर व आॅइल इंजिन पाण्यात बुडून गेले. काही शेतकऱ्यांचे पिकामध्ये पाणी घुसलेले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे.परिसरातील वाकी, कुर्णोली, कोरपगाव, भावली, वाळविहीर, पिंपळगाव भटाटा, आडवण, घोटीवाडी, खंबाळे, टाकेघोटी, धाणोर्ली या गावांना यापुढे टंचाईच्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या शेतीचा प्रश्न गंभीर होईल यासाठीच पाण्याचा विसर्ग बंद करीत असल्याचे शेतकरी नेते देवराम मराडे यांनी निवेदनात म्हटले आहे.या आंदोलनप्रसंगी शेतकरी नेते देवराम मराडे, बाळासाहेब धुमाळ, हनुमान काळे, गोपाळ शेलार, भरत चव्हाण, पांडुरंग शेलार, भीमराव डोळस, नवनाथ कोकणे, प्रकाश डोळस, कारभारी गायकवाड, त्र्यंबक कोकणे, अशोक सराई, काशीनाथ कोकणे, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)