शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचा शेतातच मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:15 IST

सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देजागता पहारा । येवला तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे बळीराजा धास्तावला

पाटोदा : सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा दिला आहे. कांदा चोर माहिती असूनही शेतकरी भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याने कांदा चोरट्यांचे फावले आहे. कांद्याचे रक्षणसाठी शेतकरीवर्गाने शेतातच मुक्काम ठोकल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात कमालीची चढउतार होत असल्याने शेतकºयांची कांदा विक्रीसाठीची लगबग सुरू असून, कांदा काढणीला वेग आलेला आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी दिवसरात्र एक करून कांदा विक्र ीसाठी तयार करीत आहे. मात्र तालुक्यात कांदा चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकºयांनी चोरट्यांची धास्ती घेतली आहे. कांद्याला सध्या सोन्याचा दर असल्याने शेतात मुक्काम करून रात्र जागून काढण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. चोरटे कांद्यासह शेतकºयांच्या शेतोपयोगी साहित्यांचीही चोरी करत आहे. यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. यात विद्युतपंप, स्टार्टर, केबल, पाईप, औषध फवारणी पंप आदी वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरी होऊनही केवळ पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको म्हणून शेतकरीवर्ग तक्र ार करीत नाही, तर काही शेतकरी धास्तीपोटी चोरांपासून पुढील काळात शेतपिकांना हानी होऊ नये, म्हणून तक्रार करत नाही़पोलीस गस्त वाढविण्याची मागणी काही दिवसांपासून तालुक्यात कांदा चोर सक्रिय झाले आहेत. कांद्यासह शेतोपयोगी साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कांदा चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

टॅग्स :agricultureशेती