शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जागा देण्यास शेतकऱ्यांचा नकारच

By admin | Updated: October 28, 2015 23:34 IST

शासन निर्णयास विरोध : आधी जमिनीचे मूल्यांकन वाढविण्याची मागणी

नाशिक : साधुग्रामसाठी लागणारी जागा शेतकऱ्यांनी कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय त्वरित द्यावी, यासाठी शासनाने बोनस टीडीआर देण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या पचनी पडलेला नाही. मुळात शेती क्षेत्राचा टीडीआर असल्याने त्याचे मूल्यांकन कमी आहे, त्यातच ३ कोटी चौरस फुटाचा टीडीआर मिळणार म्हणून भाव कोसळले तर शेतकऱ्यांच्या टीडीआर पडत्या दरानेच खरेदी करावे लागणार असल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयास स्वच्छ शब्दात नकार दिला आहे. या जागांचे मूल्यांकन (रेडीरेकनर) जानेवारी महिन्यात आणि तेही रहिवासी क्षेत्रानुसार वाढणार असेल, तरच जमीन देऊ, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केल्याने साधुग्रामचा तिढा ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता आहे.साधुग्रामसाठी शासनाने सव्वा तीनशे एकर क्षेत्र राखीव ठेवले असून, त्यापैकी ५४ एकर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित जागेसाठी शासनाने बोनस टीडीआर देण्याची तयारी दर्शविली होती तसा प्रस्ताव महापालिकेकडे मागितला होता. महापालिकेने एकास सहा म्हणजे सहापट टीडीआर देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असला तरी शासनाने एकास अडीच म्हणजेच अडीचपट टीडीआर मंजूर केला आहे.

 

मुख्यमंत्र्यांना साकडे

तपोवनात शेती क्षेत्राचे मूल्यांकन वाढावे यासाठी एका स्थानिक आमदाराच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यांनी मूल्यांकन वाढविण्यासाठी अधिकार्‍यांना भेट घेण्यास सांगितले. अद्याप हा निर्णय झालेला नाही. मात्र, १ जानेवारीपासून मूल्यांकन वाढेल, असे त्यांनी सांगितले. सध्या तपोवनात शेतीचे दर २२00 रुपये चौरस फूट, तर लगतच्या रहिवासी क्षेत्रात १४ हजार रुपये मीटर जमिनीचे भाव असल्याचे जाणकारांनी सांगितले.