शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

नाशिक : भारतात कोरोनाची लाट सुरू असताना कोणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयके पारित केले असून, या ...

नाशिक : भारतात कोरोनाची लाट सुरू असताना कोणाचीही मागणी नसताना केंद्र सरकारने शेतकरीविरोधी विधेयके पारित केले असून, या नवीन कृषी कायद्यांमुळे देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारने हे नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांसह कामगार व विद्यार्थी संघटनांनी नाशिक जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी (दि.२६) ठिय्या आंदोलन करीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र मोदी सरकार बड्या भांडवलदारांच्या दबावाखाली हे कायदे मागे घेण्यास तयार नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, त्यामुळेच शेतकरी हे आंदोलन करूनही त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नसल्याचे नमूद करीत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देत केंद्र सरकारला शेतकर्‍यांच्या या मागण्या त्वरित मान्य करण्यासोबतच नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या किमान आधारभूत मूल्याअधिक ५० टक्के सूत्रानुसार शेतमाल खरेदीची कायदेशीर हमी देण्याबाबात सूचना करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, आंदोलकांनी शेती वाचवा, लोकशाही वाचवा, शेतकरीविरोधी कायदे रद्द करा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. महिला आंदोलकांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हातात फलक घेऊन आंदोलनात समभाग घेतला होता. यावेळी शेतकरी व कामगार संघटनांचे सीताराम ठोंबरे, सुनील मालुसरे, राजू देसले, शशिकांत उणवने, महादेव खुडे, प्रभाकर वायचळे, रमेश आवटे, गोरखनाथ बलकवडे, वित्तल घुले, अशोक खलकर, पद्माकर इंगळे, देवीदास हजारे, विराज देवांग शुभम ढेरे, रोहन पगारे, स्वाती त्रिभुवन, दिनेश सातभाई,संतोष काकडे, मुकुंद रानडे, अविनाश दोंदे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

===Photopath===

260621\26nsk_22_26062021_13.jpg

===Caption===

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करताना आंदोलक