शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम नियोजनासाठी शेतकऱ्यांची लगबग

By admin | Updated: May 29, 2016 23:18 IST

बेलगाव कुऱ्हे : नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, कोळप आदि औजारांची दुरुस्ती

बेलगाव कुऱ्ऱ्हे : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, पाबर, कोळप आदि पारंपरिक औजारे कुशल कारागिरांकडून बनवली जात आहे. दुष्काळी परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना अनेक कारणांनी पैशांची झळ बसत आहे.काही दिवसात पावसाचे आगमन होण्याची चिन्हे असून ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवून घेतात; मात्र महागाईमुळे औजारांनादेखील अडीच हजार रुपये खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसूनदेखील ते खरेदी करीत आहे. काळाच्या ओघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये भाव एकरला मोजावे लागत आहे. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील १३० गावे खरीप हंगामासाठी निश्चित केली असली तरी कागदी घोडे नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील महसुली गावांमध्ये अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात. मेच्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन दुरुस्ती, मशागतीची कामे केली जातात; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे व अवकाळीच्या माजवलेल्या कहरामुळे ग्रामीण भागातील काही शेतकऱ्याकडे जमीन दुरु स्ती, मशागतीसाठी पैसेच शिल्लक नसल्याने ते आता हवालदिल झाले आहेत. कर्जाच्या डोंगराची परतफेडदेखील होणे शक्य नाही. अशातच खरीपपूर्व मशागतीसाठी असणाऱ्या औजारांना बाजारात प्रचंड मागणी वाढली असून शासनाने शेतकऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी तत्काळ योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची अनेक कामे रखडली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे सुरू करतात; मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेत मशागतीकडे दुर्लक्ष होत आहे.गेल्या चार पाच वर्षात खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. यावर्षी भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. उन्हाची तीव्रता अधिक असून शेतकऱ्याच्या हातात पैसाच नसल्याने ऐन वेळेला पाहू, निघेल काहीतरी मार्ग कदाचित असाच विचार तालुक्यातील शेतकरी करीत असावा असे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. यंदा घेतलेली रब्बी पिके हाती लागली नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खरीप पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. दुष्काळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा शासनाकडून सातत्याने होत आहे. परंतु दुसरीकडे याच शासनाला रब्बी हंगामातील बाधित शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा विसर पडला आहे. (वार्ताहर)