शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या आडून शेतकऱ्यांची गळचेपी

By admin | Updated: June 2, 2017 01:17 IST

नाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे. पर्यायी रस्ते असताना समृद्धीसाठी आग्रह करण्यात समृद्धी कुणाची, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. नाशिकला हुतात्मा स्मारकात गुरुवारी (दि.१) समृद्धी कुणाची? शेतकऱ्यांची की सरकारची? या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. कानगो यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे, दत्तात्रय डुकरे-पाटील, अरुण गायकर यांच्यासह समृद्धीबाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. कानगो म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. जागतिकीकरणानंतर सगळ्या प्रश्नांवर जागतिक प्रभाव पडतो आहे. शेतीमालाची भाव हातात राहिलेली नाही. त्यात दृष्काळाने व सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. समृद्धी हाही अशाच धोरणातून जन्माला आलेला एक मोठा प्रश्न आहे. कुठलीही चर्चा नसताना, लोकशाहीने ज्या आमदार, खासदारांना अधिकार दिले आहे, अशा लोकप्रतिनिधींचे अधिकार काढून घेत, कंपनीकरणातून हा प्रकल्प लादला जातो आहे. सध्या स्थितीत दोन रस्ते, विमान, रेल्वेसेवा असताना समृद्धी रस्ता मागितला कुणी? तरीही, तो लादला जातोय असे ते म्हणाले.