शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी ‘त्या’ शेतकºयांची जमीन खरेदी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:47 IST

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देणाºया शेतकºयांकडून जादा पैसे लाटण्यासाठी योजल्या जात असलेल्या विविध क्लृप्त्यांवर प्रशासनातील अधिकारी देखरेख ठेवून असून, ज्या ज्या शेतकºयांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीनंतर मूल्यांकनाच्या दरम्यान शेतात नवीन बांधकामे केली आहेत, अशा शेतकºयांच्या गटांची खरेदीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जमिनीतील पूर्वपरिस्थिती पाहण्यासाठी उपग्रहाची मदतही घेण्याचे निश्चित केले आहे.

ठळक मुद्देनवीन बांधकामांवर नजर : प्रशासन उपग्रहाची घेणार मदत ‘लोकमत’ने यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देणाºया शेतकºयांकडून जादा पैसे लाटण्यासाठी योजल्या जात असलेल्या विविध क्लृप्त्यांवर प्रशासनातील अधिकारी देखरेख ठेवून असून, ज्या ज्या शेतकºयांनी जमिनीच्या संयुक्त मोजणीनंतर मूल्यांकनाच्या दरम्यान शेतात नवीन बांधकामे केली आहेत, अशा शेतकºयांच्या गटांची खरेदीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जमिनीतील पूर्वपरिस्थिती पाहण्यासाठी उपग्रहाची मदतही घेण्याचे निश्चित केले आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते. समृद्धी महामार्गासाठी जमिनी जात असलेल्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील काही शेतकºयांकडून संयुक्त मोजणीच्या अगोदर व नंतर जमिनीचे मूल्यांकन वाढविण्यासाठी रातोरात शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले जात असल्याच्या घटना घडत असल्याने त्यातून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक करण्याचे उद्योग केले जात असल्याचे उघड केले होते. समृद्धीसाठी जमिनी देणाºया शेतकºयांना वाढीव मोबदला मिळवून देण्याचे सांगून एजंटही या कामी सक्रिय झाले व त्यांनी तर काही ठिकाणी स्वत:च गुंतवणूक करून शेतकºयांच्या शेतात पोल्ट्रीचे शेड उभारले व त्यात निम्म्या हिश्श्यावर आपला हक्क सांगितला. काही शेतकºयांनी मोजणीनंतर शेतात विहिरी खणून घेतल्या तर काहींनी लांबून पाइपलाइन टाकून कोरडवाहू जमीन बागायती असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न केले.या सर्व पार्श्वभूमीवर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेण्यात आली असून, संयुक्त मोजणीनंतर ज्यांनी शेतात नवीन बांधकामे, झाडांची लागवड, पाइपलाइन, विहिरीचे खोदकाम केले असेल त्यांच्या जमिनींची खरेदी न करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना निफाडचे प्रांत अधिकारी महेश पाटील यांनी, शेतकºयांकरवी केल्या जात असलेल्या मूल्यांकन वाढीच्या प्रयत्नांवर अधिकारी लक्ष ठेवून असून, त्यातील काही शेतकºयांची माहिती व पुरावेही मिळाल्याचे सांगितले. ज्या शेतकºयांनी हा प्रकार केला अशांच्या खरेदी थांबविण्यात आल्या असून, त्यांच्याकडून खरेदीसाठी तगादे सुरू असल्याचे ते म्हणाले. संयुक्त मोजणीनंतर शेतकºयांनी शेतजमिनीत जे काही बदल केले असतील त्याची खात्री करण्यासाठी उपग्रहाच्या छायाचित्राची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरडवाहू जमिनीचे बागायतीत रूपांतर करण्यावरही लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. काणाडोळा केल्याची भावनापडीक शेतात आंबा व नारळांची झाडे लावण्याचे प्रकारही राजरोस घडत असताना प्रशासकीय पातळीवर मात्र याकडे सोयीस्कर काणाडोळा करण्यात येत असल्याची भावना अन्य शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात होती.