खामखेडा : परिसरातील शेतकऱ्याकडे पैसा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे. आर्थिक अडचणीमुळे दिवाळी सण साधेपणाने साजरी करण्यात आली. दिपावली सण म्हटला की यात खर्च जास्त प्रमाणात होते. दरवर्षी दिपावलीच्या आदि. शेतकऱ्याजवळ या दिवसामध्ये पावसाळी. कांद्याचे उत्पादन सुरु होत होते. त्यामुळे शेतकऱ्याचे हातामध्ये पैसा राहत असे. तसेच मकाचे सुद्धा पिक तयार होऊन मक्याची काढणी करुन मार्केट विक्री करुन पैसा येत असे. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे उन्हाळी कांद्याबरोबर कांद्याचे ढोगळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु यंदा उशीरा पावसामुळे पिकांची पेरणी उशीरा झाली. तसेच पावसाळी कांद्याचे रोपही उशीरा टाकली गेली. त्यामुळे कांद्याची लागवड उशीरा झाली. त्यामुळे अजून पावसाळी कांदा तयार झाला नाही. तसेच मका बाजरीचे पिके जोमात असतांना पावसाने ओढ दिल्याने दाणे पाहिजे त्याप्रमाणात भरली गेली नाहीत. अजून मका तयार झाला नाही. उन्हाळी कांद्याचे बियाणे पाहिजे त्या प्रमाणामध्ये उगवले नाही त्यामुळे सध्या बळीराजाच्या हातामध्ये पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे जो दरवर्षी मोठ्या आनंदाने सण साजरा करीत होते. तो या वर्षी करता आला नाही. (वार्ताहर)
खामखेडा परिसरातील शेतकरी संकटात
By admin | Updated: October 26, 2014 23:47 IST