शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अफवांच्या लाटेत भरडला शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:11 IST

जगभरात कोरोनाने घातलेल्या थैमानाने येवला तालुक्यातील व्यावसायिक व शेतकरी वर्गावर खूप मोठा विपरीत परिणाम झालेला दिसत आहे.

ठळक मुद्देकोरोना : शेळीपालन, पोल्ट्री व्यवसाय धोक्यात

येवला : जगभरात कोरोनाने घातलेल्या थैमानाने येवला तालुक्यातील व्यावसायिक व शेतकरी वर्गावर खूप मोठा विपरीत परिणाम झालेला दिसत आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे एकीकडे कोरोनामुळे परिसरातील शेतीला जोडधंदा शेळीपालन, पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आले असून, व्यावसायिक बेरोजगारीच्या वाटेवर आहे तर दुसरीकडे त्यापटीत भाजीपाला व फळांना मागणी वाढायला हवी, पण तसं न होता याच्या दरात फारशी वाढ झाली नाही.मागील वर्षी मका पिकाला सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर चालू हंगामात १२०० ते १४०० सरासरी दर मिळत आहे.त्यात पोल्ट्रीफीडमध्ये मका हे मुख्य असून, पोल्ट्री व्यवसाय जर बंद पडले तर मक्याला मागणी कमी होत आहे.दरात आणखी घसरण होण्याची भीती आहे. शिवाय चालू वर्षी अतिपावसाने कांदा रोपे सडल्यामुळे उन्हाळी मका लागवडीचे प्रमाणही वाढले आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, मका यांना बाहेरील देशात मागणी घटल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे. सदर परिस्थिती अशीच राहिली तर शेतकरी वर्ग, शेळीपालन अशा अनेक व्यवसायांवर गदा येण्याची शक्यता आहे.

शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात न लागता पोल्ट्रीफार्म हा व्यवसाय निवडला, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी व्यवसाय बंद करून बेरोजगार होण्याची वेळ आली.- सचिन दाते, व्यावसायिक, जळगाव

चालू वर्षी अतिपावसाने पिके सडली. कांदा लागवड उशिरा होऊन उत्पन्नावर परिणाम झाला. कोरोनाच्या भीतीपोटी निघालेल्या द्राक्ष उत्पन्न बाजारात गेले नाही तर वारेमाप नुकसान होईल.- विनोद वावधाने, शेतकरी, मानोरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAgriculture Sectorशेती क्षेत्र