शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर लाइन वळविण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: September 13, 2016 01:08 IST

दिंडोरी : शेतातून गेलेला पावर ग्रीड कंपनीच्या मनोरा कोसळल्याने भीती

दिंडोरी : शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या पॉवर ग्रिड कंपनीचा टॉवर अवनखेड शिवारात कोसळल्याने टॉवर लाइन प्रभावित क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर प्रकल्प बंद करून टॉवर लाइन अन्य भागात वळवावी या मागणीसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी अवनखेड येथील पडलेल्या टॉवर येथे उपोषण सुरू केले आहे.२५ आॅगस्ट रोजी निफाड व दिंडोरीच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी शिरवाडे वणी येथे सरण रचत आत्मदहन आंदोलन केले होते त्यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसात कपाती रद्द करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही आश्वासन पाळले गेले नाही. त्यातच १० तारखेला अवनखेड येथे टॉवर कोसळला. त्यामुळे सर्व शेतकरी भयभीत झाले असून, द्राक्षाबागांवरून, घराशेजारून जाणारी लाइन कधीही कोसळून अपघात होणाची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थिती टॉवर लाइन नकोच अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. सरकारने वेळीच हा प्रकल्प थांबवला नाही तर शेतकरी आत्मदहन करतील व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सदर लाइन वसाहती-शेतीक्षेत्रातून वळवून अन्य भागातून न्यावी, या मागणीसाठी सोमवार, दि. १२ रोजी सकाळी १० वाजता निफाड व दिंडोरी तालुक्यातील सर्व टॉवर लाइन बाधित शेतकऱ्यांनी सहकुटुंब अवनखेड येथील पडलेल्या टॉवरजवळ उपोषण सुरु केले आहे.सदर टॉवरच्या परिघात येणारे क्षेत्राची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे आमदार नरहरी झरिवाळ अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी सदर टॉवरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. तरी शासनाने त्विरत सर्व टॉवरचे कामाची तपासणी करावी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत न्यायिक तोडगा काढत शेतकऱ्यांना न्याय द्यावा असी मागणी केली. प्रांताधिकारी उदय किसवे यांनी आंदोलकांच्या भावना जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचिवल्या असून १४ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे तरी आंदोलन मागे घ्यावे हि विनंती केली मात्र आंदोलकांनी विभागीय आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती बघावी व आम्हाला न्याय द्यावा असी मागणी केली. उपोषण सुरूच ठेवले यावेळी सदाशिव शेळके, रघुनाथ पाटिल, निलेश कतोरे, संतोष पुरकर, संजय निफाडे, दीपक देखमुख, अमोल दवंगे, रामभाऊ जाधव, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)