चांदोरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कमर्योगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथील कृषी कन्या शुभांगी भागवत व राजश्री साबळे यांनी श्री शरदचंद्रजी पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये चालणारे कार्य, बाजार समिती मध्ये चालणारे व्यवहार,खाजगी सार्वजनिक भागीदारी,विविध कृषी उपक्रम याविषयी माहिती घेतली.तसेच वेळोवेळी बदलणारे बाजारभाव याची देखील माहिती घेतली. सचिन पाटील यांनी बाजार समितीचे कामकाज याची माहिती दिली तसेच योग्य प्रकारे मार्गदर्शन केले . प्राचार्य डॉ.इंदरचंद चव्हाण , कार्यक्रम समन्वयक प्रा. श्वेता सातपुते, प्रा. संदिप सुयर्वंशी, कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल कानडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषिकन्यांनी अनुभवले बाजार समितीचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 14:09 IST