शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: February 11, 2017 23:38 IST

संताप : कांद्यापाठोपाठ टमाट्याचेही कोसळले भाव

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा कोबी बरोबर टमाटे उत्पादन घेणारे गाव म्हणून इतर राज्यामध्ये प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस गारपीट, आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळींब आदि नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. तेव्हा शेतकरी कोबी, टमाटे आदि पिकांची लागवड करून त्यातून त्याला भाव मिळून चांगला पैसा मिळत असे. परंतु यावर्षी सर्वच पिकांचे भाव कोसळल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. खामखेडा या परिसरातील एका वेळेस शेतकरी डाळींब पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होती. त्याच्यातून त्यांना चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. परंतु डाळींब पिकावर तेल्या रोगामुळे खामखेडा परिसरातील डाळिंबाच्या बागा पूर्णपणे उपटून फेकून दिल्याने त्याचा परिणाम उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याने कांद्याबरोबर भाजीपाला वर्गीय पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने उन्हाळी कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. त्यामुळे कांद्यावर झालेला खर्चही भरून निघाला नाही. परंतु कोबीचे पीक हाती आले आणि कोबीचे भावही कोसळले. तेव्हा शेतकऱ्याने लाल कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु लाल कांद्याला पाहिजे भाव मिळत नसल्याने लाल कांद्याचे पीकही तोट्यात गेले.कारण डाळिंबाची पिके तेल्या रोगामुळे नष्ट झाल्याने शेतकर्याला आता कांदा, कोबी, किंवा टमाटे पिकाशिवाय पर्याय नाही. कांद्या पाठोपाठ कोबीचेही भाव कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व भिस्त टमाटे पिकावर होती. जून-जुलैत टमाट्याला हजार ते पंधराशे रुपये प्रति कॅरेटपर्यंत भावाने विकला गेल्याने शेतकऱ्याने टमाटे पिकांची लागवड केली. सुरुवातीला टमाट्याची रोपे खराब झाली. परंतु पुन्हा रोपे टाकून लागवड केली. ४टमाट्याचे पीक चांगले आले. सुरुवातीला थोड्या प्रमाणात टमाटे निघत होते. तेव्हा बाजारही चांगला मिळत होता. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात निघू लागल्याने टमाट्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने भाव प्रति कॅरेट पन्नास ते साठ रु पयांवर येऊन ठेपल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. एका कॅरेटमध्ये साधारण वीस किलो टमाटे मावतात. तेव्हा टमाटे एक ते दोन रुपये किलो भावाने विकला जात आहे. काही वेळेस बाजारात टमाटे विक्र ीसाठी नेले असता व्यापारी घेत नसल्याने ते शेतकऱ्याला रस्त्यात फेकून द्यावे लागतात.  उत्पादन खर्चाचा विचार करता कांदा, कोबी पिकाच्या पाठोपाठ टमाट्याचे पीकही तोट्यात आहे. यामुळे टमाटे पिकावर केलेला खर्चही निघणार नाही, त्यामुळे शेती व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. शेतात कोणते पीक करावे हा प्रश्न शेतकऱ्याला सतावत आहे.