वडांगळी : सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी येथे शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुनील रामचंद्र चव्हाणके (४२) हे शेतातील सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेततळ्यावर पाणी आणण्यासाठी गेले होते. शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून ते पडले. शेततळ्यात प्लॅस्टिकचा कागद असल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. मच्छिंद्र पाडेकर, रा. नांदूर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. शेततळ्यातून मृतदेह काढून पंचनामा करण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By admin | Updated: July 30, 2016 21:24 IST