शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दरसवाडी येथील शेतकऱ्यांने तोडला द्राक्षबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:53 IST

चांदवड (महेश गुजराथी)- तालुक्यातील दरसवाडी येथील शेतकरी समाधान शिंदे या तरुण शेतकºयांने दुष्काळी परिस्थिती , पिण्यासाठी पाणी नाही, पाटाला पाणी नाही, कर्जमाफी झाली नाही यामुळे आपला सहा बिगे द्राक्ष बाग दुष्काळास कंटाळून कुºहाडीने तोडून टाकला.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीमुळे या शेतकºयांने रविवारी सकाळी नाराजी व्यक्त करीत सरकारच्या कामकाजावर टीका करीत आपला बाग कुºहाडीने तोडून टाकला. या समाधान शिंदे व वडील शिवाजी शिंदे यांनी या द्राक्ष बागेसाठी सुमारे बारा लाख रुपयांचे कर्ज लासलगाव येथील बॅक आॅफ बडोदाचे क

चांदवड (महेश गुजराथी)- तालुक्यातील दरसवाडी येथील शेतकरी समाधान शिंदे या तरुण शेतकºयांने दुष्काळी परिस्थिती , पिण्यासाठी पाणी नाही, पाटाला पाणी नाही, कर्जमाफी झाली नाही यामुळे आपला सहा बिगे द्राक्ष बाग दुष्काळास कंटाळून कुºहाडीने तोडून टाकला..मध्यंतरी हे सर्व कर्ज माफ झाल्याची वार्ता समजताच या शेतकºयांने बॅकेकडे धाव घेतली असता पुर्वीचे कर्ज भरा व मगच तुम्हाला नवीन पिक कर्ज मिळेल असे बॅकेने बजावले. सरकारने फक्त घोषणा केली. दीड लाख रुपये सुध्दा कर्ज माफी झाली नाही अशी माहिती या शेतकºयांने बाग तोडतांना दिली. आतापर्यंत टॅँकरने विकतपाणी आणून बाग कसाबसा वाचविला. आतापर्यंत या द्राक्ष बागेसाठी सुमारे तीन लाख रुपयांचे औषधे उधार आणले या औषधाचे पैसेही अद्यापपर्यंत दुकानदाराचे दिले नाही .तर या शेतकºयांचे वय सुमारे २४ वर्षे आहे. त्याच्या जन्मापासून व वडीलांनीही बºयाच वर्षात दरसवाडी पोच कालव्यास पाणी आले नसल्याचे सांगीतले.तर आता फक्त विषारी औषध सेवन करुन जीवनयात्रा संपवावी का ? असा प्रश्न या शेतकºयांला पडला आहे. तर पिण्यासाठी गेल्या महिन्यापासून पाणी नाही. सहा बिगे कांदे केले तेही पाण्याअभावी जळून गेले. आता बाजार ,धान्य , किराणाची पंचाईत झाली असून दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न या शेतकºयांला पडला असून त्याने संताप करुन अक्षरक्ष: बाग तोडून टाकल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.