येवला : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासनाने जाहीर केलेले हेक्टरी ८ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, यासंदर्भातील मागणीचे निवेदन येवला तालुका किसान कॉँग्रेसच्यावतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना देण्यात आले.तालुका अध्यक्ष शरद लोहकरे व पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शासनाने जाहीर केलेले अनुदान तालुक्यातील काही प्रमाणत शेतकऱ्यांना मिळाले असले तरी अद्यापही बरेच शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.सध्या रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना सदर अनुदान लवकर मिळल्यास त्याचा शेतीसाठी उपयोग होईल. यावेळी उपाध्यक्ष गणेश आहेर, आबाराजे शिंदे, बाळासाहेब गरुड, भागवत जाधव, चांगदेव माळी, शिवराम वाघचौरे, दिगंबर पेढरे, भगवान जाधव, धनजंय पैठणकर, गणपत खैरनार आदी उपस्थित होते.
किसान कॉँग्रेसचे शेतकरीप्रश्नी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:33 IST