शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
2
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
3
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
4
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
5
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...
6
घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर
7
Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’
8
१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा
9
मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
10
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
11
उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
12
'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन
13
आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!
14
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
15
...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका
16
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
17
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
18
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
19
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
20
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

सटाणा तहसीलदारांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: May 23, 2017 02:09 IST

सटाणा : गारपिटीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील द्याने येथील शेतकऱ्याने सोमवारी तहसीलदारांच्या दालनात स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : गारपिटीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई न मिळाल्याने तालुक्यातील द्याने येथील शेतकऱ्याने सोमवारी तहसीलदारांच्या दालनात स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेतकरी शैलेश जिभाऊ कापडणीस (४५) याला अटक केली आहे. तीन आठवड्यांपूर्वी बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाड खोऱ्याला गारांसह मुसळधार पावसाने झोडपले होते. या गारपिटीमध्ये कांदा, डाळिंंब, टमाटा, मिरची आदी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले. महसूल विभागानेही तत्काळ पंचनामा करण्यास प्रारंभ केला होता. पंचनामा प्रक्रि या सुरु असताना द्याने येथील शेतकरी शैलेश कापडणीस यांनी पंचनामा झाल्यानंतर तत्काळ भरपाई मिळावी अन्यथा आत्मदहन करू असा इशारा तहसीलदार सुनील सैंदाणे यांना दिला होता. मात्र तीन आठवडे उलटले तरी अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान शैलेश कापडणीस यांनी तहसीलदार सैंदाणे यांचे दालन गाठले आणि भरपाईस विलंब का होतोय म्हणून जाब विचारत असतानाच अचानक खिशातून आगपेटी काढून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलदार सैंदाणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला .

आदेशानंतर भरपाईतहसीलदार सैंदाणे म्हणाले की, तालुक्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. शासनाच्या पुढील आदेशानुसारच भरपाई मिळेल. अनुदान प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.