शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील असुविधांबाबत शेतकरी संघटनेचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:54 IST

घोटी टोल प्लाझाने आपल्या हद्दीतील महामार्गावरील विविध गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागण्या पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देणात आला आहे.

ठळक मुद्देघोटी : मुंढेगाव, पिंप्री सद्रोद्दीन फाटा येथे गतिरोधकांची मागणी

घोटी : घोटी टोल प्लाझाने आपल्या हद्दीतील महामार्गावरील विविध गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मागण्या पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देणात आला आहे.गोंदे दुमाला एमआयडीसी परिसर, पाडळी देशमुख, मुंढेगाव, माणिकखांब, खंबाळे, बोरटेंभे, पिंप्री सद्रोद्दीन फाटा येथे गतिरोधक करावेत. हायमास्ट विजेची व्यवस्था, सीसीटीव्ही बसवावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. रस्ता ओलांडताना शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध नागरिक यांचे अनेकवेळा अपघात होतात. हे रोखण्यासाठी आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घोटी टोल प्लाझाची आहे. टोल प्लाझाच्या विविध कामांसाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे. स्थानिकांना टोल माफ करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष गणेश गुंजाळ, शेतकरी नेते बाळकृष्ण नाठे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण मते, सचिव अंबादास जाधव, तालुकाध्यक्ष रवींद्र तारडे, तानाजी झाडे, किसन शिंदे, रेवनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा