शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: September 13, 2016 01:10 IST

पालखेड ओव्हरफ्लोचे पाणी : नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा

 येवला : पालखेड धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येवला तालुक्याला मिळावे यासाठी सर्वपक्षीयांनी जिवाचे रान करून अखेर प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. जळगाव नेऊर येथील नदीकाठी असलेले सर्व बंधारे पाण्याने भरल्याने, पावसाअभावी खरीप पिके करपू लागल्याने या पाण्याने पिकांना जीवदान मिळेल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा जळगाव नेऊर येथील सर्वच शेतकऱ्यांना होती. परंतु नदी काठी असलेल्या शेतकरी वर्गाला या पाण्याने उभारी मिळाली असली तरी पालखेड डावा कालवा वितरीका क्रमांक २८ व २९ या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाला पाण्याची मात्र प्रतिक्षाच करावी लागली.२८ व २९ चारी क्र मांकावर सुमारे प्रत्येकी १३०० ते १४०० हेक्टर क्षेत्र असुन चारीला पाणी सोडले असते तर सर्व क्षेत्र ओलिताखाली आले असते. शेतशिवारातील विहीरींना थोड्याफार प्रमाणात पाणी उतरले असते. विशेषत: वाडी वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन जनावरांना ही पाणी उपलब्ध झाले असते. कोमेजलेली पिके कशी बशी वाचवता आली असती. मात्र पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याची प्रचिती जळगाव नेउर येथील शेतकरी वर्गाला आली. पालखेड डावा कालवा येथील लाभ क्षेत्रातील सर्वच वितरीकांना हेड टु टेल पाणी मिळणे आवश्यक होते. परंतु तसे न होता नदीकाठी असलेले बंधारे भरून देणे याचीच काळजी प्रशासनाकडुन घेण्यात आली. वितरीकांना पाणी न सोडल्याने वाडी वस्तीधारकांवर अन्याय झाल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. (वार्ताहर)