शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

By admin | Updated: March 26, 2017 22:24 IST

पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे

पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी चेक पद्धतीला पूर्णत: जेरीस आले आहे.  तीन-तीन महिने धनादेश न वटल्याने ते ‘बाउन्स’ होण्याचे प्रकार वाढले आहेत. मंगलाबाई दिलीप शेवाळे यांनी कळवण बाजार समितीत कांदा विक्री केली असता त्यांना व्यापाऱ्यांकडून देण्यात आलेला चेक वटला नाही. तर जिभाऊ कडू काकुळते यांनी चार ट्रॅक्टर कांदा विक्र ी केली असून, दोन महिने होऊनही त्यांची साठ हजार तीनशे पंचावन्न ही रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा झाली नाही. शेतकऱ्यांना त्याचे कांदा विक्र ी केल्याचे पैसे पदरी पाडण्यासाठी बॅँक व व्यापाऱ्यांच्या आडतीत फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विक्र ी केलेल्या शेतमालाचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून आरटीजीएस करून मिळावेत, अशी मागणी होत आहे. बॅँकेत धनादेश जमा करून दोन महिने उलटूनही खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी पूर्णत: कोंडीत सापडला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेतकरी नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व बाजूंनी कोंडीत सापडला गेला आहे. पिळकोस, खामखेडा, विसापूर, बेज, बगडू, भादवण, बिजोरे, चाचेर यांसह परिसरातील शेतकरी बांधव आपला कांदा, मका, गहू व भुसार माल हा कळवण बाजार समितीत विक्री करत आहे. या बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जाते. यातील बहुतेक शेतकऱ्यांचे धनादेश वटत नसल्याची तक्रार आहे. व्यापाऱ्यांकडून मिळालेले धनादेश बॅँकेत जमा करूनही एक ते दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही धनादेशाची रक्कम खात्यात जमा होत नसून शेतकऱ्यांना बॅँकेच्या खेट्या खाव्या लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे देताना व्यापाऱ्यांनी कॅशलेस पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा शेतकऱ्याला शेतमाल विकूनही एक-दोन महिन्यांसाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे चित्र परिसरात दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. नोटाबंदीमुळे शेतमाल कमी भावात खरेदी करतात. दुसरीकडे शेतकऱ्याला धनादेश देतात यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसे येण्यास एक दोन महिन्यांचा कालावधी जात असल्याने शेतीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पुढील उत्पादनावर याचा परिणाम झालेला दिसून येत असून, सर्व बाजूंनी शेतकऱ्याची कोंडी झालेली आहे. शेतीसाठी औषधे, खते खरेदी करताना शेतकऱ्याला दुकानदारांना आरटीजीएस करून पैसे द्यावे लागत आहे; मात्र बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना सरसकट धनादेश देत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे देण्याची आरटीजीएस ही सोपी पद्धत असतानादेखील व्यापारी हे शेतकऱ्यांना धनादेश देत आहेत. एक एप्रिलनंतर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून चेक स्वीकारू नयेत तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची रक्कम उपलब्ध करून द्यावी. कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना पाठीशी न घालता शेतकऱ्यांचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून देण्यासाठी आग्रह करावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा माकपाचे कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, उत्तम मोरे, अशोक जाधव, ललित वाघ, अभिजित वाघ, पंकज जाधव यांसह तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)